मातेच्या किडणीने मिळाले मुलीला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:06 PM2017-11-17T22:06:13+5:302017-11-17T22:06:32+5:30

ऐन तारुण्यात उमेदीच्या काळात दोन्ही किडण्या निकामी होवून मृत्यूशी झुंज देणाºया महिलेच्या वेदना तिच्या आईला अस्वस्थ करून गेल्या.

Maternal insect gets life for girl child | मातेच्या किडणीने मिळाले मुलीला जीवदान

मातेच्या किडणीने मिळाले मुलीला जीवदान

Next
ठळक मुद्देअकोला बाजार : ऐन उमेदीच्या काळात मुलीच्या दोन्ही किडण्या झाल्या होत्या निकामी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोलाबाजार : ऐन तारुण्यात उमेदीच्या काळात दोन्ही किडण्या निकामी होवून मृत्यूशी झुंज देणाºया महिलेच्या वेदना तिच्या आईला अस्वस्थ करून गेल्या. अखेरीस त्या मातेनेच किडणी देवून आपल्या तरुण मुलीला जीवदान दिले. आई व मुलगी दोघींचीही प्रकृती सध्या उत्तम आहे.
यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार येथील उपसरपंच दयाशंकर अवथरे यांची मुलगी सोनाली हिचा विवाह अमरावती जिल्ह्यातील बोराळा येथील गजानन करमनकर याच्याशी २०१३ मध्ये झाला. सोनालीचे पती रायपूर येथे सीआरपीएफमध्ये नोकरीला आहे. दोघांचाही संसार सुरळीत असताना नोव्हेंबर २०१६ मध्ये सोनालीला साधी सर्दी झाली. रायपूर येथे सीआरपीएफच्या रुग्णालयात तिची तपासणी केली असता निमोनिया झाल्याचे सांगितल्यानंतर बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय चाचण्यानंतर डॉ.साईनाथ पत्तेवार यांनी दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे सांगितले. हे ऐकून करमनकर व अवथरे या दोन्ही कुटुंबांचे अवसानच गळाले. त्यानंतर सहा महिने सोनालीवर डायलिसीसचे उपचार सुरू होते. प्रकृतीत मात्र सुधारणा नव्हती. किडणी बदलविल्याशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरने सांगितले. अखेरीस आई शोभा अवथरे हिने आपल्या मुलीची स्थिती पाहून स्वत:ची किडणी मुलीला देवून तिला जीवदान दिले.

Web Title: Maternal insect gets life for girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.