माहूर तीर्थेक्षेत्र विकासासाठी निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 09:55 PM2018-10-22T21:55:55+5:302018-10-22T21:56:11+5:30

माहूर गडाच्या विकासासाठी महिनाभरात भरीव निधी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वस्तांना दिली.

Mahur will provide funds for the development of the pilgrimage area | माहूर तीर्थेक्षेत्र विकासासाठी निधी देणार

माहूर तीर्थेक्षेत्र विकासासाठी निधी देणार

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची ग्वाही : दिवाळीनंतर माहूरला भेट देणार

लोकमत न्यूज नेटवर्क
माहूर : माहूर गडाच्या विकासासाठी महिनाभरात भरीव निधी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वस्तांना दिली.
रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, आशीष जोशी यांनी रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची नागपूर निवासस्थानी भेट घेतली. त्यांना देवीचा प्रसाद देऊन माहूरला येण्याचे निमंत्रण दिले. यावेळी माहूर तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाने २१६ कोटींच्या आराखड्यास शासनाने मंजूर देऊनही अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याचे विश्वस्तांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी येत्या महिनाभरात भरीव निधी देण्याची ग्वाही दिली. तसेच दिवाळीनंतर रेणुकादेवीच्या दर्शनाला माहूर येथे येणार असल्याचे विश्वस्तांना सांगितले.

Web Title: Mahur will provide funds for the development of the pilgrimage area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.