रेशीम उत्पादनात महाराष्ट्र ठरले उदयोन्मुख राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:33 AM2019-02-20T11:33:31+5:302019-02-20T11:35:13+5:30

राज्याच्या कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी परंपरागत पिकांना फाटा देत रेशीम उत्पादनाकडे राज्य वळत आहे. राज्यात १६ हजार एकरवर रेशीम लागवड झाली. या क्रांतीकारी बदलाची दखल केंद्र शासनाने घेतली आहे.

Maharashtra as the emerging state in the production of silk | रेशीम उत्पादनात महाराष्ट्र ठरले उदयोन्मुख राज्य

रेशीम उत्पादनात महाराष्ट्र ठरले उदयोन्मुख राज्य

Next
ठळक मुद्देकेंद्राकडून दखलक्षेत्र वाढण्यात अमरावती विभागासह यवतमाळचा सिंहाचा वाटा

रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्याच्या कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी परंपरागत पिकांना फाटा देत रेशीम उत्पादनाकडे राज्य वळत आहे. राज्यात १६ हजार एकरवर रेशीम लागवड झाली. या क्रांतीकारी बदलाची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. रेशीम उत्पादनात उदयोन्मुख राज्य म्हणून महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला आहे. या गौरवात अमरावती विभाग आणि यवतमाळ जिल्ह्यातील लागवडक्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे.
जगभरात रेशीम उत्पादनात ९९.९९ टक्के वाटा चिनचा आहे. यामुळे रेशीम उत्पादनात संपूर्ण बाजारपेठ चिनने काबीज केली आहे. भारतालाही रेशीम उत्पादनात सर्वाधिक वाव आहे. अशा प्रकारची सुपीक जमीन महाराष्ट्रात आहे. यामुळे महाराष्ट्रात रेशीम उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हातात पैसा पडण्याची शक्यता आहे. रेशीम उत्पादनाला जागतिक बाजारात चांगली किंमत आहे. किमान ६०० रूपये किलोच्या वरच आजपर्यंत कोशाचे दर राहिले आहे. वर्षभरात शेतकऱ्यांना किमान सहा वेळा पीक घेता येते. अमरावती विभागाचा लागवड क्षेत्राचा आकडा चार हजार एकरवर गेला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात १३०० एकरवर लागवड झाली आहे. ५९० एकर लागवडीसाठी शेतकरी तयार आहेत. एकूणच रेशीम लागवडीकडे शेतकरी वळत आहे.

रेशीम धाग्याला मोठी मागणी
जागतिक बजारात रेशीम धाग्याला मोठी मागणी आहे. यातून चांगला रोजगारही मिळू शकतो. यामुळे असे युनिट तयार करण्यासाठी शेतकरी आता पुढे येत आहेत. यातून शेतकऱ्यांना कोषापेक्षा जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे.

रेशीम उत्पादनात जिल्ह्याला मोठी संधी आहे. यामुळे जिल्हा २०० एकरवरून दोन हजार एकरकडे वाटचाल करीत आहे. पुढील काळात हे क्षेत्र वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ

Web Title: Maharashtra as the emerging state in the production of silk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती