Lok Sabha Election 2019; सर्वदूर उत्सव पण आजंती शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:27 PM2019-04-11T22:27:05+5:302019-04-11T22:28:39+5:30

मागील ४० वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या नेर तालुक्यातील आजंती येथील मतदारांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. एक हजार १८९९ पैकी १७० लोकांनी मतदान केले.

Lok Sabha Election 2019; Universal festival but calm down | Lok Sabha Election 2019; सर्वदूर उत्सव पण आजंती शांत

Lok Sabha Election 2019; सर्वदूर उत्सव पण आजंती शांत

Next
ठळक मुद्देमतदानावर बहिष्कार : पाणी प्रश्नाने त्रस्त नागरिकांचा रोष, प्रशासनाने निवेदन अडगळीत टाकले

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : मागील ४० वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या नेर तालुक्यातील आजंती येथील मतदारांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. एक हजार १८९९ पैकी १७० लोकांनी मतदान केले. दिवसभर पाण्याच्या शोधात बाहेर पडणारे महिलांचे पाय आज मात्र मतदानाच्यावेळी घरातच अडखळून पडले. या गावातील मतदान केंद्रावर सन्नाटा होता.
गावातील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना तकलादू ठरल्या. दरवर्षी जानेवारी महिन्यातच गावातील जलस्रोत आटायला सुरू होते. एप्रिल आणि मे महिन्यात तर महिलांना रात्रंदिवस पाण्याचाच वेध असतो. बैलबंडीने दूर शेतातून पाणी आणावे लागते. पाणीटंचाईमुळे गावात विवाह समारंभ होत नाही. शहरातील खर्चिक अशा मंगल कार्यालयात जाऊन कार्यप्रसंग पार पाडावे लागतात.
गतवर्षी गावातील महिलांनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले होते. यावर कुठलेही सकारात्मक पाऊल उचललेले नाही. गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला. सर्वांनीच याला समर्थन दिले. याविषयीचे निवेदन तहसील विभागाला देण्यात आले होते. याची दखल घेण्यात आली नाही. अखेर हा इशारा प्रत्यक्षात उतरविण्यात आला. या गावातील मतदान केंद्राच्या रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट होता. परिणामी तालुक्यात अल्प मतदानाची टक्केवारी आजंती येथील मतदान केंद्रावर पाहायला मिळाली. मात्र गावातील दुसºया गटाने मतदान करून या बहिष्काराला खो दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नागरिकांनी नोंदविल्या तीव्र भावना
मतदानावर बहिष्कार टाकताना या गावातील नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सुनीता श्रृंगारे यांच्या पतीचे गतवर्षी अपघाती निधन झाले. पाणी समस्या मांडण्यासाठी ते गेले होते. परतत असताना रेती तस्करीच्या ट्रकने त्यांचा जीव घेतला. त्यांनी प्रशासनाविषयी आपला रोष व्यक्त केला. कुसूमताई साबळे, राखी नीलेश जुनघरे, सतीश अरसोड, रमेश गायकवाड, नेर बाजार समितीचे उपसभापती दिवाकर राठोड, रेखा विजयकार आदी नागरिकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. प्रत्येक वर्षी पाण्यासाठी हाल सहन करावे लागत असेल तर मतदान कशाला करायचे, असा प्रश्न या गावातील लोकांनी मांडला आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Universal festival but calm down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.