तलावफैलात जिनिंगला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 09:24 PM2019-02-07T21:24:23+5:302019-02-07T21:25:37+5:30

शहरातील तलावफैल, गवळीपुरा परिसरात असलेल्या गणेश कॉटन इंडस्ट्रीज या जिनिंगमध्ये बुधवारी सायंकाळी ७ वाजता आग लागली. येथील कापूस व गठाणींनी पेट घेतला. गुरुवारी रात्रीपर्यंत जिनिंगमधील आग धगधगत होती.

Junking Fire in Lake Flora | तलावफैलात जिनिंगला आग

तलावफैलात जिनिंगला आग

Next
ठळक मुद्देदीड कोटींवर नुकसान : आतषबाजीतील ठिणगी पडून रूई पेटली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील तलावफैल, गवळीपुरा परिसरात असलेल्या गणेश कॉटन इंडस्ट्रीज या जिनिंगमध्ये बुधवारी सायंकाळी ७ वाजता आग लागली. येथील कापूस व गठाणींनी पेट घेतला. गुरुवारी रात्रीपर्यंत जिनिंगमधील आग धगधगत होती. नगरपरिषदेच्या अग्नीशमन विभागाने सलग १२ तास आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या आगीत प्रथमदर्शनी दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
गणेश कॉटन इंडस्ट्रीजच्या परिसरातून लग्नाची वरात जात होती. वरातीत आतिषबाजी करण्यात आली. आकाशात उडणाऱ्या फटाक्याची ठिणगी पडून जिनिंगमधील कापसाने पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले. जिनिंग प्रेसिंग करून ठेवलेल्या कापूस गठाणींना आगीने भक्षस्थानी घेतले. नगरपरिषदेच्या अग्नीशमन विभागाचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र कापूस गठाणी असल्याने आग विझविताना अडचणी येत होत्या. यवतमाळ नगरपरिषदेचे दोन आणि दिग्रस पालिकेचा एक या तीन बंबाद्वारे रात्रभर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. गुरुवारी सायंकाळीही या आगीचे धग कायम होती. केवळ अग्नीशमन दलाच्या प्रयत्नामुळे यवतमाळ शहरात होणारा मोठा अनर्थ टळला. जिनिंग परिसरात झोपडपट्टी व दाट वस्तीही आहे. आगीवर पूर्ण नियंत्रण मिळाले नसले तरी फैलाव रोखण्यात अग्नीशमन विभागाला यश आल्याची माहिती विभाग प्रमुख संतोष तेलंगे यांनी दिली.
 

Web Title: Junking Fire in Lake Flora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.