भीमा हाटे मृत्युप्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:39 PM2018-07-21T23:39:07+5:302018-07-21T23:40:28+5:30

पुसद शहरातील भीमा हाटे मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविला जावा, अशी शिफारस राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली आहे. त्याला मंजुरीची प्रतीक्षा आहे.

To investigate the Bhima dam violence, give CID | भीमा हाटे मृत्युप्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे द्या

भीमा हाटे मृत्युप्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे द्या

googlenewsNext
ठळक मुद्देमहासंचालकांकडे शिफारस : डीआयजींकडून आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पुसद शहरातील भीमा हाटे मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविला जावा, अशी शिफारस राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली आहे. त्याला मंजुरीची प्रतीक्षा आहे. दरम्यान शनिवारी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी या प्रकरणाचा येथे पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
श्रीकांत तरवडे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून अमरावती परिक्षेत्रात रुजू झाल्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच यवतमाळात आले. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीत फेरफटका मारुन स्थिती जाणून घेतली. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या समवेत पुसदच्या भीमा हाटे मृत्यू प्रकरणाशी संबंधित अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, पुसदचे एसडीपीओ अजयकुमार बन्सल (आयपीएस) व सर्व संबंधित पोलीस अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. २९ एप्रिल रोजी भीमा तुकाराम हाटे (३०) रा. आंबेडकर वार्ड पुसद याला विनयभंगाच्या आरोपात अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याला प्रथम पुसद व नंतर सेवाग्राम येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पुसदचे तत्कालीन ठाणेदार अनिलसिंह गौतम यांनी आपल्या कक्षात भीमा याला मारहाण केल्याचा व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या प्रकरणात तारांकित प्रश्न गुरुवारी उपस्थित करण्यात आला होता. याच अनुषंगाने उपमहानिरीक्षक तरवडे यांनी येथे प्रकरणाचा आढावा घेऊन नेमके तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पुसदमध्ये गौतम यांच्या समर्थनार्थ तसेच विरोधातही पालकमंत्र्यांना निवेदने देण्यात आली होती.
गौतम यांनी अवैध व्यावसायिकांना वठणीवर आणल्यानेच त्यांच्या विरोधात हे निमित्त साधून वातावरण तापविले गेले, या मुद्यावरही उपमहानिरीक्षक तरवडे यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जाते.
डीआयजी सोमवारी पुन्हा यवतमाळात
पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे सोमवारी २३ जुलै रोजी पुन्हा यवतमाळात येत आहेत. आगामी गणेशोत्सव, दुर्गोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाभरातील संवेदनशील क्षेत्राच्या ठाणेदारांची बैठक ते घेणार आहेत. यात सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाणार आहे. शिवाय क्रियाशील गुंड, हिस्ट्रीशिटर, सवयीचे अवैध दारू विक्रेते यांच्या विरोधातील एमपीडीए, तडीपारी, प्रतिबंधात्मक कारवाई याचाही आढावा घेतला जाणार आहे.
मोहीम तीव्र होणार,गुन्हेगारी
टोळीतील गटबाजीवरही वॉच
या बैठकीनंतर गुंडांविरुद्ध पोलिसांची मोहीम तीव्र होणार आहे. यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळातील प्रमुख टोळीच्या हालचालींवर पोलिसांचा संपूर्ण वॉच आहे. वरवर ही टोळी एकसंघ दिसत असली तरी प्रत्यक्षात अर्थकारणावरून या टोळीत प्रचंड असंतोष धुमसतो आहे. या टोळीत दोन गट पडण्याची, त्याचे रक्तरंजित पडसाद उमटल्यास ऐन सण-उत्सव आणि आगामी निवडणुकीच्या काळातच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची हूरहूर पोलिसांना आहे. म्हणूनच पोलिसांचा या टोळीतील तमाम सदस्यांच्या हालचालींवर गुप्तपणे वॉच आहे. त्यांची उत्पन्नाची साधणे, वारेमाप खर्च व आर्थिक ‘उलाढाली’वरसुद्धा पोलिसांची नजर असल्याचे सांगितले जाते.
नातेवाईकांची हजेरी सीसीटीव्हीत केवळ ११ मिनिटे
पोलीस सूत्रानुसार, भीमा हाटे मृत्यू प्रकरणात अनेक बाबतीत तफावत आढळून आली आहे.
ठाणेदार गौतम यांनी त्याला दीड तास कक्षात मारहाण केली व आम्ही दोन तास बाहेर बसून त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकत होतो, असा आरोप भीमाच्या नातेवाईकांनी केला तर ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये नातेवाईक केवळ ११ मिनिटे तेथे बसून असल्याचे आढळून आले.
भीमाला किडनीचा जुनाच आजार होता. त्याला दारूचेही व्यसन होते. किडनीबाबत वेळेवर उपचार न घेतल्याने आजार बळावला. त्याच्या शरीरात युरियाचे प्रमाण आढळले. ही सर्व कारणे त्याच्या मृत्यूला प्रथमदर्शनी जबाबदार ठरल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
भीमाचे रक्त नमुने, व्हीसेरा रासायनिक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पोलिसांना त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

Web Title: To investigate the Bhima dam violence, give CID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस