पांढरकवडातून अवैध व्यावसायिक भूमिगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:26 PM2019-01-18T22:26:58+5:302019-01-18T22:28:05+5:30

कै.वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरूवारी पांढरकवडा शहरातील मटका, जुगार अड्डयाचे स्टींग आॅपरेशन केल्यानंतर अवैध व्यावसायिकांची चांगलीच दाणादाण उडाली. नव्या ठाणेदाराच्या कार्यपद्धतीची जाणिव असल्याने शहर व तालुक्यातील अवैध व्यावसायिक भूमिगत झाले आहेत.

Illegal business underground | पांढरकवडातून अवैध व्यावसायिक भूमिगत

पांढरकवडातून अवैध व्यावसायिक भूमिगत

Next
ठळक मुद्देनवे ठाणेदार रुजू : चोरमंडी परिसरात शुकशुकाट, मटका अड्डा चालकांची धरपकड

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : कै.वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरूवारी पांढरकवडा शहरातील मटका, जुगार अड्डयाचे स्टींग आॅपरेशन केल्यानंतर अवैध व्यावसायिकांची चांगलीच दाणादाण उडाली. नव्या ठाणेदाराच्या कार्यपद्धतीची जाणिव असल्याने शहर व तालुक्यातील अवैध व्यावसायिक भूमिगत झाले आहेत. शुक्रवारी नवे ठाणेदार अनिलसिंह गौतम यांनी शहरात फेरफटका मारून परिस्थितीचे अवलोकन केले.
शहरातील आठवडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत. हे अवैध धंदे बंद करण्याचे वरिष्ठांचे आदेश झुगारूनदेखील पांढरकवडा शहरात अवैध धंद्यांना परवानगी देण्यात आली होती. यामुळे शेतकरी वर्ग लुटल्या जात होता. यातून शेतकरी आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी किशोर तिवारी यांनी हे अड्डे बंद व्हावेत, याकरिता गुरूवारी स्वत: या अड्डयांवर फिरून स्टींग आॅपरेशन केले. त्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली. याची दखल घेत ठाणेदार बचाटे यांची त्याच दिवशी तडकाफडकी बदली करण्यात आली. गुरूवारी रात्रीच त्यांच्या जागी नवे ठाणेदार म्हणून अनिलसिंह गौतम यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला. ही वार्ता अवैध व्यावसायिकांत पसरताच, सर्व अवैध धंदे चालक आपला गाशा गुंडाळून भूमिगत झाले. पोलीस यंत्रणेकडून या सर्वांची माहिती गोळा करणे सुरू असून त्यांना तातडीने पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश गौतम यांनी दिल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
पाटणबोरीचा आंतराज्यीय जुगार अड्डयाला टाळे
पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे आंतराज्यीय जुगार अड्डा भरविला जातो. यवतमाळच्या पोलीस यंत्रणेने अनेकदा हा अड्डा उद्ध्वस्थ केला. मात्र स्थानिक पोलिसांच्या परवानगीने हा अड्डा अजुनही सुरूच होता. मात्र गुरूवारी किशोर तिवारी यांनी केलेल्या स्टींग आॅपरेशननंतर पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी अनिलसिंह गौतम यांची नियुक्ती करण्यात येताच, पाटणबोरीतील आंतरराज्यीय जुगार अड्डयाला अवैध व्यावसायिकांनी टाळे ठोकले. शुक्रवारी दिवसभर हा अड्डा बंद होता.
शासनाच्या चुकीच्या धोरणाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहे, त्यात भर म्हणून राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळेदेखील शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला.
कोणतेही अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत-गौतम
ठाण्याअंतर्गत कोणत्याही ठिकाणी अवैध धंदे चालू देणार नाही. तसेच कोणत्याही राजकीय दबाबापोटी गुन्हेगारांना पाठिशी घालणार नाही , असे ठाणेदार अनिलसिंह गौतम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अप्रीय घटना घडू नये, याचीही खबरदारी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Illegal business underground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.