पुसद तालुक्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:49 PM2018-06-23T22:49:22+5:302018-06-23T22:49:58+5:30

गत दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी रात्री दमदार आगमन झाले. मध्यरात्री १२.३० वाजतापासून ४.३० वाजेपर्यंत पुसद शहरासह तालुक्यात धुव्वाधार पाऊस कोसळला.

Heavy rain in Pusad taluka | पुसद तालुक्यात दमदार पाऊस

पुसद तालुक्यात दमदार पाऊस

Next
ठळक मुद्देपूस नदी फुगली : धरणात ३३ टक्के जलसाठा, नदी-नाले खळखळले

शेतकरी सुखावला : आतापर्यंत ३४० मिमी पावसाची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : गेल्या तीन दिवसांच्या उघाडीनंतर पुसद तालुक्यात सोमवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पुसद शहरासह ग्रामीण भागातही दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. सोमवारी तालुक्यात ३६ मिमी पावसाची नोंद झाली असून यावर्षी आतापर्यंत ३४० मिमी पाऊस कोसळला आहे.
यावर्षी मृग नक्षत्राच्या प्रारंभापासूनच तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ७ जून रोजी सहा मिमी, ८ जून रोजी तीन, ९ जूनला ५५, १० ला १६, १२ ला ३१, १३ ला ६२, १४ ला ९६, १५ ला ३५ तर १९ जून रोजी ३६ मिमी असा आतापर्यंत एकूण ३४० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबगही सुरू झाली आहे. कृषी केंद्रांमध्ये बियाणे खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. या पावसाने पेरणीसोबतच धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. नदी-नाले तुडूंब भरले असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघाला आहे. बहुतांश गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाईसुद्धा संपुष्टात आली आहे. विहिरी व बोअरवेल्सलाही चांगल ेपाणी आहे. १७, १७ व १९ जून या तीन दिवसात पावसाने उघडीप दिली असली तरी ऊन खूप तापल्याने वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. परंतु सोमवारच्या पावसाने दिलासा मिळाला आहे.

 

Web Title: Heavy rain in Pusad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.