हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळाच्या नीतिकाला सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:04 PM2018-02-24T22:04:24+5:302018-02-24T22:04:24+5:30

येथील हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील एमपीएडची विद्यार्थिनी नीतिका सतीशकुमार शर्मा ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकली.

Hanuman Vibhushan School Sports Club Nitiika Gold | हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळाच्या नीतिकाला सुवर्ण

हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळाच्या नीतिकाला सुवर्ण

Next

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : येथील हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील एमपीएडची विद्यार्थिनी नीतिका सतीशकुमार शर्मा ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकली. ९.३५ सीजीपीए घेऊन ती गुणवत्ता यादीत प्रथम आली. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात तिला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.
महाविद्यालयाचे कार्यकारी अध्यक्ष किशोर दर्डा, कार्यकारी प्राचार्य डॉ. वीरेंद्र तलरेजा यांनी नीतिका शर्मा हिचे कौतुक केले. तिला एमपीएड प्रमुख डॉ. सुहास तिवळकर, बीपीएड प्रमुख प्रा. प्रेमेंद्र रामपूरकर, बीपीई प्रमुख प्रा. अभय भिष्म, प्रा. अजय कोलारकर, प्रा. सदानंद मेश्राम, डॉ. संतोषी राऊळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
रवींद्र निमट, विजय वाघ, सुनील काळे, विनोद डगवार, धनराज बंबावले, राजू अलोणे, विकास चिंचोळकर यांनीही तिच्या यशाचे स्वागत केले.

Web Title: Hanuman Vibhushan School Sports Club Nitiika Gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.