दारव्हा येथे गारपीट, पुसदमध्ये वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 09:37 PM2018-02-13T21:37:56+5:302018-02-13T21:39:29+5:30

तालुक्याला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गारपीटीने तडाखा दिला. वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने अक्षरश: झोडपून काढले. या गारपिटीने तालुक्यातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

Hailstorms in Darwath, storm rains in Pusad | दारव्हा येथे गारपीट, पुसदमध्ये वादळी पावसाचा तडाखा

दारव्हा येथे गारपीट, पुसदमध्ये वादळी पावसाचा तडाखा

Next
ठळक मुद्देतालुक्याला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गारपीटीने तडाखा दिला.

दारव्हा : तालुक्याला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गारपीटीने तडाखा दिला. वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने अक्षरश: झोडपून काढले. या गारपिटीने तालुक्यातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. काही गावातील घरांची पडझड झाली. अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गारपिटीला सुरुवात झाली. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. साधारणत: लिंबाच्या आकाराएवढ्या गारा कोसळल्या. १९७० नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचे जुने जाणते सांगत आहे. या गारपिटीमुळे शहरातील रस्ते पांढरे झाले होते. काही वाहनांचे नुकसान झाले. तालुक्यातील फळबागांचेही गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पुसद : तालुक्यातही सायंकाळच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. रविवार आणि सोमवारीही तालुक्यातील काही परिसरात वादळी पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील रबी हंगामातील गहू, हरभरा, टरबूज आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका बसला आहे.

Web Title: Hailstorms in Darwath, storm rains in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस