The government should be ashamed of being a beneficiary of the people, Supriya Sule's attacking speech | जनतेला लाभार्थी म्हणताना सरकारला लाज वाटली पाहिजे, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 

यवतमाळ - यवतमाळ येते राष्ट्रवादी काँग्रेसनं आज हल्लाबोल यात्रेला सुरुवात केली. यावेळी झालेल्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. लाभार्थी म्हणताना सरकारला लाज वाटली पाहिजे, असं त्य म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला आज यवतमाळमधून सुरूवात झाली. यावेळी झालेल्या सभेत सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका करताना, लाभार्थी हा शब्द वापरताना सरकारला लाज वाटायला पाहिजे असं म्हटलं. जनता न्याय मागतेय आणि तो त्यांचा हक्कच आहे, त्यामुळे लाभार्थी म्हणणं चुकीचं आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सभेची सुरुवात  त्यांनी किटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या गजानन फुलमाळी यांची मुलगी प्रतिक्षा फुलमाळी हिच्या भाषणाने केली. फुलमाळी कुटुंबियांची सर्व जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याची घोषणा यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.  

या हल्लाबोल यात्रेत सुळेंव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी मोदी आणि फडणवीस सरकराचा खरपूस समाचार घेतला. 

वाचा सभेत कोण काय म्हणाले ?

1. सुप्रिया सुळे, खासदार

 • शेतकरी विषबाधेने मेले नाही तर मग सरकार 2 लाखाची मदत का देतंय.
 • 24 तास माध्यमांमध्ये झळकणारे मुख्यमंत्री यवतमाळात लपून छपून का आले?
 • बोंडअळी ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाही त्यांचे तक्रारींचे फॉर्म भरून घेतले नाही।
 • कर्जमाफीचे 6 हजार कोटी कुठे वाटले, कुण्या बँकेत गेले की पक्षाच्या खात्यात गेले?
 • शेतकऱ्यांच्या आत्महत्येची जबाबदारी घेऊन 302 कलम देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरेंवर लावायचे का? मुख्यमंत्र्यांना सवाल
 • 100 टक्के कर्जमाफी होईपर्यंत राकाँ स्वस्थ बसणार नाही.

 

2. अजित पवार काय म्हणाले 

 • सरकार कर्जबाजारी; शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मनस्थितीत नाही.
 • सरकार बोगस खोटारडं दिशाभूल करणारं
 • जनतेच्या करातून खोट्या जाहिराती दिल्या जातात
 • सोयाबीन मातीमोल भावात विकावा लागतोय
 • भ्रष्टाचारी अकार्यक्षम अपयशी कारभार
 • शेतकरी धर्म शेतकरी जात जगली पाहिजे.
 • मुख्यमंत्री बीड ला गेले त्यावेळी शेतकऱ्यांवर लाठीमार का?
 • कशाची मस्ती कशाची धुंदी आली आहे सरकारला।
 • भोगा कमळाची फळं असं म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.

 

3. धनंजय मुंडे 

 • ज्या विदर्भाने भाजप ला भरभरून मतं दिले तिथेच सर्वाधिक आत्महत्या वाढल्या आहेत. मोदींनी शेतीमालाला भाव देण्याचा दिलेला शब्द फसवा निघाला.
 • किटकनाशकाने बोंडातली अळी मेली नाही मात्र शेतकरी मेला.
 • शेतमालाला भाव नसल्यानं सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत.
 • आत्महत्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे.
 • मोदींनी 15 लाख खात्यात जमा करण्याचा शब्द फिरवला.


4. जयंत पाटील, माजी मंत्री

 • शेतकऱ्यांच्या संपामुळे कर्जमाफी घोषणा सरकारने केली.
 • शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चिंता नसल्यानेच सरकारकडून कर्जमाफी देण्यास चालढकल केली जात आहे.
 • विदर्भासाठी विदर्भातल्या मंत्र्यांनी कोणते उद्योग आणले ?
 • प्रसारमाध्यमं बघून काम करण्याची मुख्यमंत्र्यांना सवय.
 • भाजप आमदार ठेकेदाराला खंडणी मागतात त्यांना मुख्यमंत्र्यांची भीती नाही.
 • फडणवीस गृहमंत्री मात्र नागपूर गुन्हेगारांची राजधानी बनविली आहे.

 

या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री मनोहर नाईक, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री फौजिया खान, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ उपस्थित होते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.