अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:24 PM2018-07-17T22:24:09+5:302018-07-17T22:24:55+5:30

लोहारा ते धामणगाव रोड बायपासचे चौपदरीकरण होत असल्याने या मार्गावरील अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या, या मागणीचे निवेदन खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Give encroachers alternative space! | अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या!

अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या!

Next
ठळक मुद्देलोहारा-धामणगाव रस्ता : भावना गवळी यांच्या नेतृत्त्वात प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोहारा ते धामणगाव रोड बायपासचे चौपदरीकरण होत असल्याने या मार्गावरील अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या, या मागणीचे निवेदन खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून जागा रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेली ५० वर्षांपासून याठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना ऐन पावसाळ्यात हटविण्याचे प्रयत्न होत आहे. या अतिक्रमणधारकांनी खासदार गवळी यांची भेट घेतली. त्यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यानंतरच अतिक्रमण हटविण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. नगरपरिषद मुख्याधिकाºयांशी चर्चा करून जागेची पाहणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करून त्यांना घरे द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, उमाकांत पापीनवार, किशोर इंगळे, संजय रंगे, एकनाथ तुमकर, गजानन पाटील, शहर प्रमुख पिंटू बांगर, सुजित मुनगीनवार, ज्योती चिखलकर, अमोल धोपेकर, सचिन चव्हाण, मनीषा नागदेवते, श्याम जाधव, उमेश पुडके, निरंजन खडसे, अनिता आंबेडकर आदी उपस्थित होते.

Web Title: Give encroachers alternative space!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.