अखेर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:28 PM2018-06-22T22:28:25+5:302018-06-22T22:28:38+5:30

जिल्हा पोलीस दलात महिनाभरापासून सुरू असलेल्या अंतर्गत बदल्यांच्या चर्चेला गुरुवारी रात्री पूर्णविराम मिळाला. बदलीची अधिकृत यादी पोलीस अधीक्षकांनी जाहीर केली.

Finally police officers transfers | अखेर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अखेर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next
ठळक मुद्देकही खुशी कही गम : जिल्ह्याबाहेर जाणारे दहा अधिकारी कार्यमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलात महिनाभरापासून सुरू असलेल्या अंतर्गत बदल्यांच्या चर्चेला गुरुवारी रात्री पूर्णविराम मिळाला. बदलीची अधिकृत यादी पोलीस अधीक्षकांनी जाहीर केली. यात १५ अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अनेक इच्छुकांचा हिरमोड झाल्याने ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती आहे.
अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी बचाटे यांना पांढरकवडा, यवतमाळ शहर ठाणेदार यशवंत बावीस्कर यांना आर्णी, नियंत्रण कक्षातील दिनेशचंद्र शुक्ला यांना अवधूतवाडी, पुसद ग्रामीणचे धनंजय जगदाळे यांना मुकुटबन, नियंत्रण कक्षातील आनंद वागदकर यांना आर्थिक गुन्हे शाखा, नियंत्रण कक्षातील संजय चौबे यांना पुसद ग्रामीण, आर्थिक गुन्हे शाखेचे दिलीप वडगावकर यांना मारेगाव पोलीस ठाणे देण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षकांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील प्रशांत गिते यांना वडकी, सारंग मिराशी यांना लाडखेड, रवींद्रनाथ भंडारे यांना वसंतनगर, उमरखेड येथील सुभाष उन्हाळे यांना दराटी, नेर येथील अजय भुसारी यांना पारवा, वडकी येथील दीपक पवार यांना शिरपूर, लाडखेड येथील नरेश रणधीर यांना कळंब पोलीस ठाणे देण्यात आले.
बदली प्रक्रियेत इच्छुकांनी अनेक बाजूंनी राजकीय वशिला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र चर्चेतील अनेकांचा हिरमोड झाला. बदली प्रक्रिया प्रशासकीय दृष्टीकोनातून राबविण्यात आल्याचे दिसून येते. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्हाअंतर्गत बदलीची यादी जाहीर केली.
जिल्ह्यातील २९ एपीआय-पीएसआयचे स्थानांतरण
जिल्ह्यातील विविध ठाण्यात कार्यरत २९ पोलीस उपनिरीक्षकांचे स्थानांतरण झाले आहे. त्यात रवींद्र ताले, योगेश इंगळे, शब्बीर खान पठाण, रंगनाथ जगताप, प्रफुल्ल डवले, वसंत मडावी, विजय ढाके, सोपान पाटोळे, सचिन चव्हाण, विनायक राठोड, बसवराज तमशेट्टे, निलेश शेळके, विजयमाला रिठ्ठे, सचिन भोंडे, विजय गराड, योगेश हिवसे, मंगेश भोयर, उमेश नासरे, शुभांगी गुल्हाने, अलका गायकवाड यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सचिन लुले, सुगत पुंडगे, सुष्मा बावीस्कर, अमरसिंह पाटील, विनोद झळके, संघरक्षक भगत, नितीन पतंगे, प्रमोद पाचकवडे, मनोज लांडगे यांचा समावेश आहे.

Web Title: Finally police officers transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.