अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 10:00 PM2017-08-17T22:00:15+5:302017-08-17T22:00:39+5:30

तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असून याविरुद्ध महागाव तालुक्यातील डोंगरगावच्या नागरिकांनी ऐल्गार पुकारला .....

Fasting against illegal mineral exploration | अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात उपोषण

अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात उपोषण

Next
ठळक मुद्देडोंगरगावचे नागरिक : प्रशासनाकडून दखल नाही, उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असून याविरुद्ध महागाव तालुक्यातील डोंगरगावच्या नागरिकांनी ऐल्गार पुकारला असून स्वातंत्र्यदिनापासून येथील तहसील कार्यालयापुढे उपोषणास प्रारंभ केला आहे. दुसºया दिवशीही प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नाही. दुसरीकडे उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे.
महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे जेसीबीच्या सहाय्याने मातीचे उत्खनन होत असल्याची तक्रार प्रशांत दिंगबर देशमुख यांनी महागाव तहसीलदारांकडे केली होती. मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे १५ आॅगस्टपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली. त्याच उपोषण मंडपात खामलवाडी येथील रमेश रामदास पवार यांनीही उपोषण सुरू केले. त्यांच्या शेतातून अवैधरित्या एक हजार ब्रास रेती नेल्याची तक्रार आहे. एकाच मंडपात प्रशांत देशमुख व रमेश पवार यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
आज दुसºया दिवशीही प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नाही. उपोषणकर्त्यापैकी एकाची प्रकृती खालावली आहे. मात्र जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Web Title: Fasting against illegal mineral exploration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.