मुकुटबनमध्ये शेतकरी मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:38 PM2018-03-22T23:38:57+5:302018-03-22T23:38:57+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एक रकमी कर्ज परतफेड योजनेबाबत शेतकरी सभासदांकरिता मेळावा घेण्यात आला.

Farmers' meet in Mukutaban excited | मुकुटबनमध्ये शेतकरी मेळावा उत्साहात

मुकुटबनमध्ये शेतकरी मेळावा उत्साहात

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समितीत एक रकमी कर्ज परतफेड योजनेबाबत शेतकरी सभासदांकरिता मेळावा

ऑनलाईन लोकमत
मुकुटबन : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एक रकमी कर्ज परतफेड योजनेबाबत शेतकरी सभासदांकरिता मेळावा घेण्यात आला.
मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय अध्यक्ष आशा जुनघरी, नरेंद्र बोदकुरवार, मारोतराव पाचभाई, सभापती संदीप बुर्रेवार, गजानन मांडवकर, बापूराव जिन्नावार, आर.आर.सिंगुरवार उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ झाले आहे, परंतु त्यावरील उर्वरित रकमेचा भरणा केला नसेल, असे पात्र लाभार्थी शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेऊ शकतात, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. संचालन बंडू रासेकर यांनी केले, तर आभार एस.एन.पानघाटे यांनी मानले. रमेश मंदावार, किशोर काळे, प्रेम अग्रवाल, राजू मांडवकर, एन.बी.मुत्यलवार उपस्थित होते.

Web Title: Farmers' meet in Mukutaban excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.