During times of crisis, Delhi goes through the streets, Valee Yede | अडचणीच्या काळात दिल्लीची नाय, गल्लीची बाय कामी येते - वैशाली येडे
अडचणीच्या काळात दिल्लीची नाय, गल्लीची बाय कामी येते - वैशाली येडे

ठळक मुद्देराष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी

यवतमाळ : अडचणीच्या काळात दिल्लीची नाय , गल्लीची बाय कामी येते असे म्हणत आत्महत्या केलेल्या शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नीने ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनात मनोगत व्यक्त केले. माझा या जन्मावर विश्वास आहे त्यामुळे मी रडत नाय तर लढतेय असे त्यांनी म्हटले.
पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन असे वाटून पतीने आत्महत्या केली खरी पण मी हीच वायद्याची शेती, माझ्या हिमतीवर फायद्याची करून दाखवणार हा विश्वास आहे असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. या व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला असे परखड शब्दात सांगून जगरहाटीने विधवापण लादल्याचे अधोरेखित केले.


या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सांगू इच्छिते की, लेखक आणि कष्टकरी सारखेच आहेत. दोघांनाही भाव मिळत नाही. मात्र संमेलनाच्या निमित्ताने अ भावाने जगणाऱ्याला भाव मिळेल ही आशा व्यक्त करते. 


Web Title: During times of crisis, Delhi goes through the streets, Valee Yede
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.