जिल्हा पोलीस लागले सण-उत्सवाच्या तयारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 09:40 PM2019-07-17T21:40:03+5:302019-07-17T21:40:22+5:30

अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी पहिल्यांदाच जिल्हा पोलीस दलाचा आढावा घेतला. बुधवारी सकाळी एसपी कार्यालयातील सर्व शाखांंना भेट देऊन पाहणी केली. नवीन इमारत बांधकाम बघितले.

The district police started preparing for the festival | जिल्हा पोलीस लागले सण-उत्सवाच्या तयारीला

जिल्हा पोलीस लागले सण-उत्सवाच्या तयारीला

Next
ठळक मुद्देपोलीस महानिरीक्षकांकडून आढावा : एसपी कार्यालय व मुख्यालयाचा फेरफटका

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी पहिल्यांदाच जिल्हा पोलीस दलाचा आढावा घेतला. बुधवारी सकाळी एसपी कार्यालयातील सर्व शाखांंना भेट देऊन पाहणी केली. नवीन इमारत बांधकाम बघितले. नियंत्रण कक्षातही प्रत्यक्ष भेट दिली. येणाऱ्या सण-उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क करण्याच्या अनुषंगाने महानिरीक्षकांनी आवश्यक माहिती घेतली.
विशेष महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी यापूर्वी उमरखेड येथे मॉबलिंचींग विरोधातील मोर्चावरून उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली होती. परिक्षेत्रात रुजू झाल्यानंतर त्यांनी जवळपास सर्वच जिल्ह्यांंना भेटी दिल्या. यवतमाळ जिल्हा मुख्यालयाची पाहणी प्रलंबित होती. येत्या सण-उत्सव व निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हानिहाय भेट देऊन तेथील एकंदरच पोलीस कामगिरी व गुन्ह्यांच्या स्थितीचा आढावा महानिरीक्षक स्वत: घेत आहे. सकाळी ११ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला त्यांनी भेट दिली. येथील नियंत्रण कक्ष, वाचक शाखा, महिला सेल, सायबर सेल, ठसे तज्ज्ञ विभाग या ठिकाणी भेट दिली. तेथील प्रमुखांशी चर्चा केली. नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्यासोबत बराच वेळ बंदद्वार चर्चा करून जिल्ह्यातील स्थितीचा आढावा जाणून घेतला. भौगोलिक क्षेत्राच्या दृष्टीने यवतमाळ जिल्हा अमरावती परिक्षेत्रात सर्वात मोठा आहे. येथील विभागनिहाय समस्या वेगवेगळ्या आहेत. त्याबाबत उपाययोजनेसाठी कुठली प्रतिबंधात्मक पावले उचलता येईल यावरही चर्चा करून निर्देश दिले.
तूर्त प्रत्येक विभागाचा आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा रानडे यांनी घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून त्यांनी पोलीस मुख्यालयात भेट दिली. तेथे मानवंदनेचा सोपस्कारही पार पडला. प्रत्यक्ष पाहणीतूनच नेमकी काय स्थिती आहे हे लक्षात येते. त्यानंतरच पुढील उपाययोजना ठरविणे सोईचे ठरते, असे मकरंद रानडे यांनी सांगितले.
लवकरच अ‍ॅक्शन प्लॅन - मकरंद रानडे
अमरावती परिक्षेत्रातील जिल्ह्यांचा स्वतंत्र आढावा घेतला आहे. त्याच प्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कामगिरीत व सातत्याने पोलिसांपुढे येत असलेल्या अडचणी, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना याचा अ‍ॅक्शन प्लॅन एकंदर माहिती गोळा झाल्यानंतरच ठरविण्यात येईल. तूर्त येथील प्रमुख समस्या कुठल्या हे जाणून घेत असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी सांगितले. येत्या काळात येथील धार्मिक सण-उत्सव व विधानसभा निवडणूक शांततेत पार पडाव्या या अनुषंगाने स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून हा अ‍ॅक्शन प्लॅन राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The district police started preparing for the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.