गौण खनिजाचे अवैध खनन रोखण्यासाठी जिल्हास्तर पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:03 PM2018-11-20T22:03:04+5:302018-11-20T22:03:27+5:30

संपूर्ण जिल्ह्यात गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात अवैध खनन होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय पथकाची निर्मिती केली आहे. १० सदस्यीय पथकाचे नेतृत्व खनिकर्म अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे.

District level team to prevent illegal mining of minor minerals | गौण खनिजाचे अवैध खनन रोखण्यासाठी जिल्हास्तर पथक

गौण खनिजाचे अवैध खनन रोखण्यासाठी जिल्हास्तर पथक

Next
ठळक मुद्देखनिकर्म अधिकारी : पथकात १० सदस्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण जिल्ह्यात गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात अवैध खनन होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय पथकाची निर्मिती केली आहे. १० सदस्यीय पथकाचे नेतृत्व खनिकर्म अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे.
कोट्यवधीच्या रेतीघाटामधून मोठ्या प्रमाणात खनन होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी खनिकर्म विभागाचे जिल्हास्तरीय पथक निर्माण करण्याचे आदेश दिले. हे पथक जिल्ह्यातील रेतीघाटांची पाहणी करणार आहे. अनपेक्षितपणे धाडी घालणार आहे. जिल्हा खनिकर्म अधिकाºयांचे त्यावर नियंत्रण राहणार आहे. उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तालुका दंडाधिकारी, पोलीस निरीक्षक यांना या प्रकरणाची तत्काळ दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वाहन चालक आणि मालकाविरोधात कलम ३७९, १८८ आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८, ७, ८ नुसार कारवाई केली जाणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये आदेश निर्गमित केले.

रेतीघाटांची मुदत संपल्यापासून आतापर्यंत खनिकर्म विभागाने केलेल्या कारवाईत १०५ अवैध साठे जप्त करण्यात आले. ३९ प्रकरणात ४२ लाख रूपयांचा दंड आकारण्यात आला. २२ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या ३२९२ ब्रास रेतीमधून ३५ लाख १८ हजार रुपयांचा महसूल मिळविण्यात आला आहे.

Web Title: District level team to prevent illegal mining of minor minerals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू