सरकारच्या धोरणामुळे ग्रामीण भागात नैराश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:17 PM2018-04-19T22:17:29+5:302018-04-19T22:17:29+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळच्या दाभडीत येऊन जाहीर सभा घेतली. शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना आश्वासने दिली. मात्र चार वर्षात एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट शासकीय धोरणांमुळे ग्रामीण भागात नैराश्य निर्माण झाले आहे.

 Depression in the rural areas due to government policy | सरकारच्या धोरणामुळे ग्रामीण भागात नैराश्य

सरकारच्या धोरणामुळे ग्रामीण भागात नैराश्य

Next
ठळक मुद्देशिवाजीराव मोघे : पांढरकवडा ते दाभडी आत्मक्लेश यात्रेतून पुढे आले वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळच्या दाभडीत येऊन जाहीर सभा घेतली. शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना आश्वासने दिली. मात्र चार वर्षात एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट शासकीय धोरणांमुळे ग्रामीण भागात नैराश्य निर्माण झाले आहे. प्रत्येक जण यामुळे त्रस्त आहे. यामुळेच आपण काढलेल्या पांढरकवडा ते दाभडी या आत्मक्लेश यात्रेत अनेक जण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, असे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आर्णी तालुक्यातील दाभडी येथे २०१४ मध्ये तेव्हाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला होता. देशभरातील शेतकऱ्यांना येथून संबोधित केले होते. मात्र आता त्यांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट दिवसेंदिवस शेतकरी, शेतमजुरांची परिस्थिती खालावत आहे. बाजारभावातही मोठी घसरण झाली आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकºयांना रांगेत उभे केले. आज अपेक्षा भंग झाल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्याची खरी आकडेवारी दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे वास्तव आपल्याला पदयात्रेतून अनुभवता आल्याचे मोघे यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री चुकीचा निर्णय घेतात. त्यामुळेच त्यांना जनतेत जाण्याची भीती वाटते. त्यांनी नुकताच यवतमाळ दौरा रद्द केला. या उलट यवतमाळचे सुपुत्र वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना १९७२ च्या दुष्काळी स्थितीत थेट जनतेत जाऊन उपाययोजनांचा अभ्यास करीत होते. यातून रोजगार हमी सारखी योजना अस्तित्वात आली. पळपुटेपणा करणाºया सरकारला हे समजणार नाही, अशी कोपरखळीही शिवाजीराव मोघे यांनी लावली. सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करताना अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविले. परंतु आता सरकारने अशा योजनांनाच कात्री लावली. एकाही आर्थिक विकास महामंडळाकडे निधीच नसल्याचे त्यांनी सांगितले.
पांढरकवडा ते दाभडी या आत्मक्लेश पदयात्रेचे अनुभव सांगताना ते म्हणाले, आता वयाची ७३ वर्षे पूर्ण झाली आहे. पदयात्रा काढण्याबाबत शारीरिक ताण येईल, अशी भीती होती. मात्र ग्रामीण भागातील जनतेची स्थिती पाहून हे दडपण झुगारुन दिले. काय होणार या पेक्षा वाईट म्हणून स्वत: पूर्णवेळ चालण्याचा निर्णय घेतला. चार दिवस पायी चालण्याने लढण्याचा आत्मविश्वास वाढला. गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक जण शासनाच्या चुकीच्या धोरणाने होरपळल्या होत्या. त्या दहासमोर ४२ अंश उन्हाच्या झळाही कमीच होत्या. म्हणूनच ही पदयात्रा चार दिवसात पूर्ण झाल्याचे मोघे यांनी सांगितले.

Web Title:  Depression in the rural areas due to government policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.