अपघातात दीर-भावजय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:28 PM2018-02-18T23:28:44+5:302018-02-18T23:29:32+5:30

मुलीच्या घरी आयोजित ‘माता का जगराता’ कार्यक्रमासाठी जाताना भरधाव ट्रकने दोन कारला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दीर-भावजय जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले.

Deer-body dies in an accident | अपघातात दीर-भावजय ठार

अपघातात दीर-भावजय ठार

Next
ठळक मुद्देबोटोणी येथे ट्रकची कारला धडक : सात जण गंभीर, मृत व जखमी मारेगावचे

ऑनलाईन लोकमत
मारेगाव : मुलीच्या घरी आयोजित ‘माता का जगराता’ कार्यक्रमासाठी जाताना भरधाव ट्रकने दोन कारला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दीर-भावजय जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मारेगाव-करंजी मार्गावरील बोटोणी गावाजवळ शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडला. मृतक व सर्व जखमी मारेगाव येथील किराणा व्यावसायिक सिडाणा परिवारातील आहे.
जितेंद्र दयाराम सिडाणा (४७) आणि किरणताई मोहन सिडाणा (४०) रा. मारेगाव अशी मृत दीर-भावजयीचे नाव आहे. तर श्रीराम दयाराम सिडाणा (४५), दिव्या जितेंद्र सिडाणा (३५), नितू श्रीराम सिडाणा (४२), इंदर दीपक चान्ना (२८), रश्मी इंदर चान्ना (२५), कान्हा श्रीराम सिडाणा (५), लाडो जितेंद्र सिडाणा (९) सर्व रा. मारेगाव अशी जखमींची नावे आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मारेगाव येथील किराणा व्यावसायिक सिडाणा परिवार करंजी येथील मुलीकडे ‘माता का जगराता’ कार्यक्रमासाठी शनिवारी रात्री १० वाजता क्र.एम.एच.२९-आर-५५६७, आणि क्र.एम.एच.२९-एडी-३३१६ या दोन कारने करंजीकडे जात होते. त्यावेळी बोटोणी ते जळका दरम्यान समोरुन आलेल्या भरधाव ट्रकने एका प्रथम पांढºया रंगाच्या कारला जबर धडक दिली. त्याच वेळी पाठीमागे असलेली लाल रंगाची दुसरी कारही या अपघातग्रस्त वाहनांवर धडकली. धडक एवढी भीषण होती की, कारचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात पहिल्या कारमधील जितेंद्र आणि किरणताई ठार झाले. तर सात जण गंभीर जखमी झाले.
जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताने मारेगाववर शोककळा पसरली आहे. रविवारी दुपारी दीर-भावजयीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जितेंद्र सिडाणा यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तर किरणताई सिडाणा यांच्या मागे पती, दोन मुली, एक मुलगा आहे.

Web Title: Deer-body dies in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात