पाळण्याचा गळफास लागून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:12 AM2018-11-17T00:12:48+5:302018-11-17T00:13:08+5:30

स्थानिक जांब रोड परिसरात घराच्या पोर्चमध्ये पाळण्यावर खेळताना गळफास लागून १४ वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वेश वसंत राऊत असे या मुलाचे नाव आहे.

The death of the child due to the abduction of the child | पाळण्याचा गळफास लागून मुलाचा मृत्यू

पाळण्याचा गळफास लागून मुलाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक जांब रोड परिसरात घराच्या पोर्चमध्ये पाळण्यावर खेळताना गळफास लागून १४ वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वेश वसंत राऊत असे या मुलाचे नाव आहे.
रविवारी सुटी असल्याने तो पाळण्यावर खेळत होता. दरम्यान त्याचा तोल जाऊन त्याला गळफास लागला. ही घटना त्याच्या लहान बहिणीच्या निदर्शनास येताच तिने आरडाओरडा केला. वडिलांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले. तेथे सर्वेशचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तो अतिशय कुशाग्र बुद्धीचा होता. जायन्टस इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता नववीला होता. त्याचे वडील वसंत राऊत हे जिल्हा पोलीस दलातील विशेष शाखा विभागात कार्यरत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बहिणीला म्हणाला होता, बोलवायला ये !
सर्वेश अत्यंत हुशार मुलगा म्हणून सर्वांच्या लाडाचा होता. सायंकाळी बहिणीला त्याने सांगितले, टीव्हीवर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सुरू झाल्याबरोबर मला बोलवायला येशील. एवढे सांगून तो पोर्चमध्ये खेळायला गेला. नंतर त्याला बोलावण्यासाठी बहीण गेली असता सर्वेश पाळण्याचा गळफास लागलेल्या अवस्थेतच दिसला.

Web Title: The death of the child due to the abduction of the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू