दारव्हा, आर्णी, राळेगाव, बाभूळगाव, घाटंजीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 09:37 PM2018-09-28T21:37:31+5:302018-09-28T21:37:58+5:30

आॅनलाईन आणि रिटेल एफडीआयविरुद्ध व्यापाऱ्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदला दारव्हा, आर्णी, घाटंजी, राळेगाव व बाभूळगाव येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Darwha, Arni, Ralegaon, Babhulgaon, Ghatanjit Bandh | दारव्हा, आर्णी, राळेगाव, बाभूळगाव, घाटंजीत बंद

दारव्हा, आर्णी, राळेगाव, बाभूळगाव, घाटंजीत बंद

Next
ठळक मुद्देव्यापारी संतापले : आॅनलाईन शॉपिंगला विरोध, कराविरूद्ध रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा/आर्णी/घाटंजी/बाभूळगाव/राळेगाव : आॅनलाईन आणि रिटेल एफडीआयविरुद्ध व्यापाऱ्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदला दारव्हा, आर्णी, घाटंजी, राळेगाव व बाभूळगाव येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला.
आॅनलाईन शॉपिंग, एफडीआयमध्ये १०० टक्के विदेशी गुंतवणूक, वॉलमार्ट व फ्लिपकार्ट आणि ई-फार्मसीची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच तुरुंगवास व दंडाची रक्कम कमी करावी, जीएसटीव्यतिरिक्त सर्व कर बंद करावे, पाच लाखांपर्यंत इन्कम टॅक्समध्ये सूट द्यावी आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
आर्णीत चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, भिकू पटेल, कचरूसेठ दुगड, रियाज बेग, प्रमोद कोट्टावार, पवन कोषटवार, संदीप लोळगे, अमीत किनकर, संदीप अंधुरे, पवन पनपालिया, करुण भंडारी, सुनील व्होरा, चिराग शहा, प्रशांत बोम्पिलवार आदींनी बंदसाठी परिश्रम घेतले. व्यापारी बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून मोर्चाने तहसीलवर धडक दिली. तेथे नायब तहसीलदार आर.ई. डेकाटे यांना निवेदन दिले.
दारव्हा येथे सकाळीच सर्व व्यापारी बांधव शिवाजी चौकात गोळा झाले. तेथून त्यांनी मोर्चाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात शहरातील व्यापारी सहभागी होते. त्यांनी उपविभागीय अधिकाºयांना निवेदन सादर केले.
घाटंजीत व्यापारी बांधवांनी बंदमध्ये सहभाग घेऊन प्रशासनाला निवेदन सादर केले. सर्व व्यापारी मोर्चाने तहसीलवर धडकले. तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
राळेगाव व बाभूळगावमध्ये औषधी विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला. शहरासह दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील औषधी दुकाने बंद होती.

Web Title: Darwha, Arni, Ralegaon, Babhulgaon, Ghatanjit Bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.