पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरूद्ध काँग्रेसचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:38 PM2018-05-24T22:38:14+5:302018-05-24T22:38:22+5:30

वाढत्या महागाईने जनता होरपळत असल्याने काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसने गुरूवारी यवतमाळ, दारव्हा, घाटंजीत आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदारांना सादर केले.

Congress's Elgar against petrol and diesel hike | पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरूद्ध काँग्रेसचा एल्गार

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरूद्ध काँग्रेसचा एल्गार

Next
ठळक मुद्देराष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांना निवेदन : यवतमाळात निवेदन, दारव्हा येथे सायकल मोर्चा, घाटंजीत धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वाढत्या महागाईने जनता होरपळत असल्याने काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसने गुरूवारी यवतमाळ, दारव्हा, घाटंजीत आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदारांना सादर केले.
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलची किंमत कमी असूनसुद्धा देशात सर्वत्र पेट्रोलियम पदार्थांच्या किमती सतत वाढत आहे. यामुळे इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव दररोज वाढत आहे. यात सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. या घटनेचा काँग्रेसने निषेध केला. विद्यमान सत्तारूढ पक्षांचे नेते विरोधात असताना भाववाढीबाबत आरडाओरड करायचे. विशेष म्हणजे त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलचे भाव आकाशाला भिडलेले असतानाही तत्कालीन सरकारने पेट्रोलियम पदार्थांचे भाव स्थिर ठेवले होते, असा दावा काँग्रेसने केला.
सरकारने सामान्य जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यवतमाळ येथे तहसीलदार सचिन शेजाळ यांना निवेदन देताना चंद्रशेखर चौधरी, उषाताई प्रवीण दिवटे, बबलू देशमुख, धनराज चव्हाण, विक्की राऊत, अरूण ठाकरे, हिरा मिश्रा, राजू बोडखे, अरुण गायधने, दत्ता हाडके, डॉ.संदीप तेलगोटे, कृष्णा पुसनाके, प्रदीप डंभारे, वैशाली सवई आदींसह काँगे्रस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घाटंजीत निवेदन
घाटंजी : पेट्रोल, डीझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरवाढीला आळा घालण्यासाटी तालुका काँग्रेसतर्फे थेट राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. वाढत्या महागाईमुळे देशात जनसामान्यांना मोठ्या आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सामान्यांचा त्रास लक्षात घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली. या आंदोलनात तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शेतकरी, बेरौजगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.विजय कडू, गणेश उन्नरकर, अनिल राठोड, माणिकराव मेश्राम, ओंकार जिद्देवार, खापरीचे सरपंच शंकर काकडे, मोबिन खान, मनोहर चौधरी, विनोद राठोड, विजय जिवतोडे, सागर डंभारे, मारोती प्रधान, विनोद राठोड, सुभाष खांडरे, अजित ठाकरे, सौरभ चौधरी, रूपेश कोटनाके आदींनी राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन तहसीलदार जी.के हामंद यांना सादर केले.
दारव्हा एसडीओंना काँग्रेसचे मागण्यांचे निवेदन
दारव्हा : डीझेल, पेट्रोलसह जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव व तूर खरेदीत उडालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ दारव्हा येथे काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डीझेलचे भाव गगनाला भिडले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्यामुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले. दुसरीकडे तूर खरेदीत प्रचंड गोंधळ घालण्यात आल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले. अद्याप हजारो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी तसेच पेट्रोल, डीझेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव सात दिवसांच्या आत कमी करावे, या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीने कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसीलपर्यंत सायकल मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. उपविभागीय अधिकाऱ्यांना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, माजी नगराध्यक्ष सय्यद फारूक, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरिनाथ सिंहे, अशोकराव नरवडे, ज्ञानेश्वर कदम, जगन पाटील, गजानन बिबेकर आदींनी निवेदन दिले.

Web Title: Congress's Elgar against petrol and diesel hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.