ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कार्यालयाची जप्ती टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:39 PM2018-04-18T23:39:04+5:302018-04-18T23:39:04+5:30

अपघात प्रकरणात नुकसानभरपाईचा आदेश दिल्यानंतरही विमा कंपनीने पैसे भरले नाही त्यामुळे बुधवारी येथील ओरियंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयावर जप्ती आणण्यात आली. मात्र कंपनीने दोन दिवसाची मुदत मागितल्याने ही जप्ती टळली.

 The confiscation of the Oriental Insurance Company office was avoided | ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कार्यालयाची जप्ती टळली

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कार्यालयाची जप्ती टळली

Next
ठळक मुद्देविमा रक्कम : दोन दिवसांचा अवधी मागितला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अपघात प्रकरणात नुकसानभरपाईचा आदेश दिल्यानंतरही विमा कंपनीने पैसे भरले नाही त्यामुळे बुधवारी येथील ओरियंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयावर जप्ती आणण्यात आली. मात्र कंपनीने दोन दिवसाची मुदत मागितल्याने ही जप्ती टळली.
कळंब येथील संजय गुल्हाने यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या प्रकरणी नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यात आला. त्यानुसार दावा मंजूर होऊन विमा कंपनीला १५ लाख ५९ हजार ४०० रुपये देण्याचे आदेश २०१४ साली देण्यात आले. परंतु कंपनीने सदर पैसे भरलेच नाही. उलट कंपनी अपिलात गेली. येथेही गुल्हाने यांच्या बाजूने निकाल देत व्याजासह २९ लाख ४६ हजार रुपये भरण्याचे आदेश दिले. परंतु कंपनी पैसे भरण्यास टाळाटाळ करीत होती. त्याविरोधात जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे इन्शूरन्स कंपनीच्या विरोधात जप्ती वॉरंट काढण्यात आला. बुधवारी हा वॉरंट बजावण्यासाठी बेलिफ बुद्धीराज काटपेलवार ओरियंटल इन्शूरन्स कंपनीच्या यवतमाळ येथील कार्यालयात पोहोचले. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांचा अवधी मागितला. दोन दिवसात पैसे न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे अ‍ॅड. भारत सोदी यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. एस.डी. देशमुख, अ‍ॅड. प्रियंका पुणेवार उपस्थित होते.

Web Title:  The confiscation of the Oriental Insurance Company office was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.