दलाली रद्द, तीन टक्के कमिशन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 09:53 PM2018-01-14T21:53:39+5:302018-01-14T21:53:56+5:30

शेतकऱ्यांचा कापूस थेट खरेदी करण्यासाठी पणन महामंडळाने व्यापाऱ्यांना परवाना दिला. त्यात दलालीला कुठेही थारा नाही. मात्र, व्यापाऱ्यांनी नियमांची पायमल्ली करीत दलालांच्या माध्यमातून कापूस खरेदी करून तीन टक्के कमशिन कापण्यास सुरूवात केली.

Canceling the brokerage, starting three percent commission | दलाली रद्द, तीन टक्के कमिशन सुरू

दलाली रद्द, तीन टक्के कमिशन सुरू

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची लूट : कापूस खरेदीवर नियंत्रण नाही

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांचा कापूस थेट खरेदी करण्यासाठी पणन महामंडळाने व्यापाऱ्यांना परवाना दिला. त्यात दलालीला कुठेही थारा नाही. मात्र, व्यापाºयांनी नियमांची पायमल्ली करीत दलालांच्या माध्यमातून कापूस खरेदी करून तीन टक्के कमशिन कापण्यास सुरूवात केली. यातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे.
कापूस विकताना शेतकऱ्यांना दोन जादा पैसे मिळावे म्हणून पणन महामंडळाने व्यापाऱ्यांना कापूस खरेदीचा थेट परवाना दिला. शेताच्या बांधावरून शेतमाल विकला जावा म्हणून थेट खरेदीचा परवाना देण्यात आला. या पद्धतीने कापसाची थेट खरेदी व्हावी, असा पणनचा उद्देश होता. मात्र कापूस खेरदीचा थेट परवाना मिळविणाऱ्या व्यापाऱ्यांनी नियमांची पायमल्ली सुरू केली. व्यापाऱ्यांनी थेट कापूस खरेदीऐवजी दलालांची मदत घेत आहे
थेट कापूस खरेदीसाठी व्यापारी शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. त्यांचे दलालच कापूस नेत आहे. रोख चुकाऱ्याच्या नावाखाली व्यापाºयांनी पळवाट शोधली. शेतकºयांना रोख चुकारा हवा असल्यास चुकाऱ्यातून तीन टक्के कमिशन कापले जात आहे. कमिशन कापून शेतकऱ्यांच्या हातात चुकारा ठेवला जात आहे. त्याला ‘दलाली’ असे गोंडस नाव देण्यात आले.
जिनिंगमध्ये दर पाडण्याची खेळी
कापूस खरेदीत शेतकऱ्यांना प्रथम चांगल्या दराची खात्री दिली जाते. मात्र प्रत्यक्षात जिनींगमध्ये कापसाचे वाहन पोहोचल्यानंतर कापसात कचरा आहे, प्रतवारी चांगली नाही, असे बहाणे सांगून दर पाडले जातात. कापूस खाली केल्यानंतर तो पुन्हा परत नेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यांनी दरासाठी आर्जव केल्यास कापूस परत घेऊन जाण्यास सांगितले जाते. तसेच २४ तासांत चुकारा देणे बंधनकारक आहे. मात्र नोटाबंदीची कारण सांगतले जाते.

Web Title: Canceling the brokerage, starting three percent commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस