आर्णी शहरात घर तेथे आम्रवृक्ष लावण्याची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 10:34 PM2019-06-18T22:34:25+5:302019-06-18T22:34:46+5:30

सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. मात्र हा दुष्काळ निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजनशून्य कृतीचा परिणाम आहे. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने ही स्थिती ओढवली आहे. त्यावरून बोध घेऊन येथील वृक्षप्रेमींनी ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना राबविणे सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच आर्णीची आंबानगरी म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.

A campaign to set up Abrams in Arni city | आर्णी शहरात घर तेथे आम्रवृक्ष लावण्याची मोहीम

आर्णी शहरात घर तेथे आम्रवृक्ष लावण्याची मोहीम

Next
ठळक मुद्देवृक्षप्रेमींचा उपक्रम : पहिल्या टप्प्यात १०० रोपट्यांची लागवड, शहराची आंबानगरीकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. मात्र हा दुष्काळ निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजनशून्य कृतीचा परिणाम आहे. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने ही स्थिती ओढवली आहे. त्यावरून बोध घेऊन येथील वृक्षप्रेमींनी ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना राबविणे सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच आर्णीची आंबानगरी म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहरातील काही वृक्षप्रेमींनी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातून कडूनिंब, वड, पिंपळासोबतच एक हजार केशर आंब्याची लागवड करून ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना अंमालात आणली. शहराला आंबानगरीचे वैभव प्राप्त करण्यासाठी शेकडो आर्णीकर धडपडत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वस्तिक जिनिंग, खासगी बाजार समिती, चेंबर आॅफ कॉमर्स, केमिस्ट अँड ड्रगीस्ट, डॉक्टर असोसिएशनच्या संयुक्त पुढाकारातून रविवारी १०० रोपट्यांची लागवड करण्यात आली.
वातावरणात होणारा बदल बघून वृक्ष लागवडीशिवाय पर्याय शिल्लक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे येथील वृक्षप्रेमींनी पुढाकार घेऊन शहरात लोक सहभागातून एक हजार आम्रवृक्ष लागवडीचा संकल्प केला. याकरिता आर्णी आम्रवृक्ष मंडळाची स्थापना करण्यात आली. यातूनच रविवारी सकाळी १०० रोपट्यांचे रोपण करण्यात आले.
वृक्षारोपणाला आमदार ख्वाजा बेग, नगराध्यक्ष अर्चना मंगाम, डॉ.शीतलकुमार गटागट, मुख्याधिकारी माळकर, ठाणेदार यशवंत बावीस्कार, दिग्रसचे ठाणेदार उदयसिंह चंदेल, आरएफओ रोडगे, मंडळ अधिकारी नाईक, नगरसेवक चिराग शहा, प्रकाश पांडे, नंदकिशोर राठी, मनोज गंगन, प्रफुल वानखडे, अशोक अग्रवाल यांच्यासह पत्रकार व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. वृक्षारोपणाचे कार्य आर्णीत उत्तरोत्तर वाढून आर्णीचे नाव ‘आंबा नगरी: म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात उदयास यावे, असे मत डॉ.गटागट यांनी व्यक्त केले.

जावयाची पाहुणचारासाठी अशीही अट
जावई म्हटलं की सन्मान आलाच. उन्हाळ्यात आंब्याचा रस म्हणजे पाहुणचाराची पर्वणी. रसाळीच्या मेजवाणीत जावयाची खास खिदमत केली जाते.मात्र येथील कोठारी परिवाराच्या जावयाने १०० रोपटी लावणार असेल, तरच सासुरवाडीला रसाळीसाठी येईल, अशी अनोखी अट घातली. डॉ.शीतलकुमार गटागट असे या जावई बापूचे नाव आहे. ते लातूर येथे वास्तव्याला असतात. डॉक्टरांना लातूरच्या दुष्काळी भागाची दाहकता माहिती आहे. त्यामुळेच ते पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवडीचा संदेश देत या मोहिमेत सहभागी झाले. त्यांची अट मान्य करून येथील कोठारी परिवाराने त्यांना १०० रोपटी लावण्याचा शब्द दिला. त्यामुळे डॉ.गटागट यांच्या उपस्थितीतच १०० रोपांची लागवड करण्यात आली.

Web Title: A campaign to set up Abrams in Arni city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.