फटाका हातात फुटल्याने शाळकरी मुलाचे दोन्ही डोळे निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:10 AM2018-10-22T11:10:58+5:302018-10-22T11:11:51+5:30

विझल्यासारखा दिसणारा फटाका हातात घेताच तो फुटल्याने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात असलेल्या भोसा येथील विद्यार्थ्याचे दोन्ही डोळे निकामी झाल्याची घटना घडली.

Both the eyes of the school boy have damaged due to cracker cracked in the hands | फटाका हातात फुटल्याने शाळकरी मुलाचे दोन्ही डोळे निकामी

फटाका हातात फुटल्याने शाळकरी मुलाचे दोन्ही डोळे निकामी

Next
ठळक मुद्देशिक्षकांनी दवाखान्यात न नेता घरी पाठवले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: विझल्यासारखा दिसणारा फटाका हातात घेताच तो फुटल्याने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात असलेल्या भोसा येथील विद्यार्थ्याचे दोन्ही डोळे निकामी झाल्याची घटना घडली.
भोसा येथील जि.प. शाळेत चौथ्या वर्गात शिकणार्र्या कृष्णा बापूराव डोळस (९) हा मुलगा शाळेच्या शेजारी फटाके उडवत असलेल्या दुसऱ्या मुलाजवळ उभा होता. त्या मुलाने पेटवलेला एक फटाका बराच वेळ झाला तरी फुटला नसल्याचे पाहून कृष्णा त्या फटाक्याजवळ गेला आणि त्याने तो हातात धरला. फटाका हातात घेताच त्याचा स्फोट होऊन त्यातील दारू कृष्णाच्या डोळ््यात गेली. या घटनेची माहिती कळताच शाळेतील शिक्षकांनी त्याला तात्काळ घरी जाण्यास सांगितले. शिक्षकांनी त्याला आधी दवाखान्यात न्यायला हवे होते असे त्याच्या पालकांचे व गावकºयांचे म्हणणे आहे. या शाळेतील शिक्षकांविरुद्ध पवन पाटील पाचकोरे यांनी तक्रार नोंदवली आहे.

Web Title: Both the eyes of the school boy have damaged due to cracker cracked in the hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.