भीमा कोरेगाव : जिल्हा बंद कडकडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 10:48 PM2018-01-03T22:48:03+5:302018-01-03T22:48:29+5:30

Bhima Koregaon: District closed Kadakadit | भीमा कोरेगाव : जिल्हा बंद कडकडीत

भीमा कोरेगाव : जिल्हा बंद कडकडीत

Next
ठळक मुद्देउत्स्फूर्त प्रतिसाद : व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली, आंदोलन शांततेत

बाभूळगावात टायर जाळले, शाळा-महाविद्यालयांना सुटी, एसटी फेऱ्या रद्द, प्रवासी खोळंबले, पोलिसांचा तगडा बंदोबस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भिमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी यवतमाळसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. लहान-मोठ्या व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे बंदला साथ दिली. शाळा, महाविद्यालयांनी सकाळीच सुटी जाहीर केली. मात्र, एसटी महामंडळाने बसफेऱ्या रद्द केल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले.
भिमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी विविध संघटनांनी जिल्हा बंदची हाक दिली होती. जिल्ह्यातील व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे बंदला साथ दिल्याने जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. यवतमाळसह जिल्ह्यातील एकाही एसटी आगारातून एकही एसटी बस बाहेर पडली नाही. त्यामुळे सर्वत्र प्रवासी खोळंबले होते. यवतमाळसह वणी, पुसद, उमरखेड, पांढरकवडा, आर्णी, बाभूळगाव, दारव्हा, नेर, मारेगाव, झरी, घाटंजी, राळेगाव, दिग्रस, महागाव, कळंब, फुलसावंगी येथेही कडकडीत बंद होता. बाभूळगाव येथे युवकांनी रस्त्यावर टायर जाळून घटनेचा निषेध केला.
यवतमाळात बसस्थानक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नागरिक मोठ्या प्रमाणात गोळा झाले. तेथे केंद्र व राज्य शासन, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याविरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली. काही युवकांनी शहरातून दुचाकी रॅली काढली. दुपारी विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी बसस्थानक परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केले. यात सर्वात समोर मुली, नंतर महिला आणि नंतर पुरुष, असा क्रम होता. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्याचवेळी बसस्थानक चौकात महिलांनी मानवी साखळी तयार करून नागपूर, वर्धा, दारव्हा, आर्णी, पुसद, अमरावती, धामणगावकडे जाणारी सर्वच वाहतूक रोखून धरली. केवळ रूग्णवाहिकेला जाऊ देण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
निवेदनातून भिमा-कोरेगाव येथे दगडफेकीत मृत्यू पावलेल्या राहुल खोब्रागडे यांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत जाहीर करावी, त्यांच्या एका नातेवाईकाला सरकारी नोकरी द्यावी, जखमींचा शासनाने उपचार करून त्यांना आर्थिक मदत द्यावी, मिलींद एकबोटे आणि इतरांना त्वरित अटक करावी, दगडफेकीत नुकसान झालेल्या वाहनधारकांना भरपाई द्यावी, निष्काळजी पोलिसांवर कारवाई करावी, या घटनेची पोलीस महानिरीक्षकांमार्फत चौकशी करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.

विविध संघटनांचा सहभाग
बंदमध्ये भारिप-बहुजन महासंघ, प्रहार संघटना, मराठा सेवा संघ, दि बुद्धिस्ट पेन्शनर्स असोसिएशन, दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, बहुजन रिपब्लिकन पार्टी, महाबोधी मुक्ती आंदोलन, राष्ट्रीय संबुद्ध महिला संघटना, बीआरएसपी, राष्ट्रीय चर्मकार संघटना, सिद्धार्थ मंडळ, सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृती समिती, नाग संघटना, संभाजी ब्रिगेड, एम.एच.२९-हेल्प लाईन, पंचशील संघटना, सत्यशोधक समाज, समता पर्व प्रतिष्ठान, ग्राहक संघटना, ब्ल्यू टायगर संघटना, रिपाई (खोब्रागडे), पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पार्टी, डॉ.आंबेडकर अभ्यासिका, शहर काँग्रेस सेवादल, सेवानिवृत्त वन संघटना, भीमशक्ती-शिवशक्ती संघटना, काँग्रेस, अल्पसंख्यक आघाडी, डॉ. आंबेडकर प्राध्यापक संघटना, प्रोटान- प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर संघटना, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय संवैधानिक हक्क परिषद, आंबेडकर सेंटर फॉर जस्टीज अ‍ॅन्ड पीस, जन आधार कृती संघर्ष समिती, विदर्भ शेतकरी विकास परिषद, अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, रिपाई (आठवले), लॉर्ड बुद्धा मैत्री संघ, अनुसूचित जाती विकास मंच, डेमॉक्रॉटिक एप्लाईमेंट सोशल असोसिएशन, राष्टÑील मूल निवासी महिला संघ, बहुजन मुक्ती पार्टी, भारतीय बौद्ध महासभा, समता पर्व महिला बचत गट आदी पक्ष, संघटनांचा समावेश होता.

Web Title: Bhima Koregaon: District closed Kadakadit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.