Babasaheb Ambedkar's fight for self-respect | बाबासाहेब आंबेडकरांचा लढा आत्मसन्मानाचा लढा
बाबासाहेब आंबेडकरांचा लढा आत्मसन्मानाचा लढा

ठळक मुद्देप्रशांत डोन्था : महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष व्याख्यान

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा सत्ता, संपत्तीसाठी नसून तो आत्मसन्मानाचा लढा होता. यासाठी आपल्याला संघर्ष सुरू ठेवावा लागेल, असे आवाहन हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकरी आंदोलनातील विद्यार्थी नेता तसा रोहित वेमुल्लाचा सहकारी प्रशांत डोन्था यांनी येथे केले.
येथील आझाद मैदानावर आयोजित स्मृती पर्वात ते ‘फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून सांसदीय लोकशाही प्रणालीसमोरील धोके’ या विषयावर बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्मृती पर्वात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औरंगाबाद येथील आत्मभान संघटनेचे युवा नेते सिद्धार्थ मोकळे यांचेदेखील व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी चंदन तेलंग होते. प्रशांत डोन्था म्हणाले, रोहित वेमुल्लाने आपले बलिदान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्व आणि सिद्धांतासाठी दिले. त्यांच्या बलिदानाने प्रखर जातीवाद पुन्हा एकदा जगाच्या पुढे उजागार झाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिका भारताचे जनक असून ते मानवतावादी महापुरुष आहे. त्यांना कुण्या एका जातीधर्मात बंदिस्त करणे गैर असल्याचे त्यांनी सांगितले.
समारोपीय कार्यक्रमप्रसंगी आनंद गायकवाड यांनी संपादित केलेल्या ‘मुक्काम पोस्ट पाटीपुरा’ या गं्रथाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामाबाई टेंभुर्णे, कमलाबाई गायकवाड, विठ्ठलराव पिंपळे, वसंतराव जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंबेडकरी साहित्य व कला अकादमीचे पदाधिकारी बळी खैरे, गोपीचंद कांबळे, डॉ. सुभाष जमधाडे, डॉ. साहेबराव कदम, संजय मानकर, संजय ढोले, अ‍ॅड. सलीम शाह, घनश्याम भारशंकर, वसंत सरपे, अशोक भवरे, योगानंद टेंभुर्णे, संजय बोरकर, प्रा. अशोक कांबळे, गोविंद मेश्राम, संघमित्रा टेंभुर्णे, रवींद्र टेंभुर्णे, हेमंत कांबळे, प्रा. युवराज मानकर, सुमेध ठमके, जे.जे. काझी, प्रशिक भैसारे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.अ‍ॅड. संदीप नगराळे, संचालन सुनील वासनिक, तर आभार कवडू नगराळे यांनी मानले. भूमिका आनंद गायकवाड यांनी विषद केली. प्रारंभी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील भावपूर्ण गीतांचा कार्यक्रम घनश्याम पाटील व संचांने सादर केला. संचालन जगदीश भगत यांनी केले. यावेळी स्मृती पर्वाचे समन्वयक ज्ञानेश्वर गोरे, एम.के. कोडापे, संजय ढाकुलकर, अरविंद खोब्रागडे, चव्हाण, माया गोबरे, सुनीता काळे, मालती गायकवाड, सुनील पुनवटकर, रियाज सिद्दिकी, धनंजय गायकवाड उपस्थित होते.


Web Title: Babasaheb Ambedkar's fight for self-respect
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.