पुसद पालिकेचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 09:48 PM2019-03-24T21:48:30+5:302019-03-24T21:49:40+5:30

नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक चारमधील नाल्यांचे अवैधरित्या बांधकाम सुरु असून नागरी वस्तीऐवजी चक्क शेतात नालीचे बांधकाम करण्यात येत असल्याने नगरपरिषद प्रशासनाचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Auspicious work of the public | पुसद पालिकेचा अजब कारभार

पुसद पालिकेचा अजब कारभार

Next
ठळक मुद्देवस्तीऐवजी शेतात नाली : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलला

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक चारमधील नाल्यांचे अवैधरित्या बांधकाम सुरु असून नागरी वस्तीऐवजी चक्क शेतात नालीचे बांधकाम करण्यात येत असल्याने नगरपरिषद प्रशासनाचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी येथील लक्ष्मण कांबळे व राजेश ढोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेला पत्र पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र नगरपरिषद प्रशासनाकडून जिल्हाधिकाºयांच्या आदेशालाही केराची टोपली दाखविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पुसद नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक चारमधील रियासत अली यांच्या कंपाऊंडपासून ते डॉ.चिद्दरवार यांच्या हॉस्पिटलपर्यंतच्या नाली बांधकामाकरिता ४ आॅक्टोबर २०१६ रोजी निविदा (क्र. १५/१७-१८) काढण्यात आली. त्या अनुषंगाने तत्कालिन ठेकेदार मोहम्मद तस्लीम यांना कामाचे दर कमी असल्याने कामाचे आदेश देण्यात आले. मात्र त्यांचे अकाली निधन झाल्याने सदर कामाची पुनर्निविदा काढणे अपेक्षित असताना तसे न करता प्रशासनाने सर्व नियम धाब्यावर बसवून कंत्राटदाराशी साटेलोटे करून ६ नोव्हेंबर २०१७ च्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. १५ अन्वये दुसºया क्रमांकाचे निविदाधारक शेख आयुब शेख शकुर यांना तीन टक्के कमी दराने देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या अनियमिततेला तत्कालिन प्रशासन व पदाधिकारी जबाबदार असल्याचे बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे, सदर नालीचे बांधकाम हे नागरीवस्तीत नसून चक्क वहितीतील शेतात करण्यात असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. सदर कामाचे कंत्राट २८ लाख ७५ हजार ३४५ रुपयांचे असून संबंधित ठेकेदाराला त्याचे देयके देण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. याबाबत येथील लक्ष्मण कांबळे व राजेश ढोले यांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली. मात्र जिल्हाधिकाºयांच्या आदेशालाही केराची टोपली दाखविण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.
 

Web Title: Auspicious work of the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.