उच्चशिक्षितांचा आदर्श विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 09:47 PM2018-03-24T21:47:04+5:302018-03-24T21:47:04+5:30

विवाह सोहळ्यावर अनाठायी खर्च करु नये, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांनी वारंवार सांगितले. याच विचाराने प्रेरित उच्चशिक्षितांनी केलेला विवाह समाजासाठी आदर्श ठरला आहे.

Adarsh ​​Marriage of Higher Education | उच्चशिक्षितांचा आदर्श विवाह

उच्चशिक्षितांचा आदर्श विवाह

Next

आॅनलाईन लोकमत
कळंब : विवाह सोहळ्यावर अनाठायी खर्च करु नये, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांनी वारंवार सांगितले. याच विचाराने प्रेरित उच्चशिक्षितांनी केलेला विवाह समाजासाठी आदर्श ठरला आहे.
कळंब तालुक्याच्या चिंचोली या अतिशय छोट्या गावची रहिवासी असलेली चंदा पाचारे. तिची घरची परिस्थिती हलाखीची. सावरगाव येथील नेहरु विद्यालयात शिकत असताना तिची अभ्यासातील गती आणि बौध्दिक क्षमता पाहून शिक्षक मनोहर जुननकर, नाना गंडे, श्रीराम गावंडे यांनी तिला शिक्षणासाठी प्रेरीत केले. शेवटी तिचे प्रामाणिक प्रयत्न व चिकाटी कामी आली. दरम्यान ती यवतमाळ येथे वसतिगृहावर अधीक्षक म्हणून रुजू झाली.
भोई समाजाच्या परिचय मेळाव्यात तिचा हनुमंत ठाकरे याच्याशी परिचय झाला. हनुमंत हा पुलगाव येथील सैनिक शाळेत नोकरीवर आहे. तोही जेमतेम परिस्थितीतून समोर आला. दुसऱ्याच्या घरी राहून त्याने शिक्षण पूर्ण केले. राष्ट्रसंतांच्या विचार व कार्याने पे्ररित झालेला हा युवक. त्यामुळे दोघांनीही अतिशय साध्या पध्दतीने सातजन्माच्या गाठी बांधण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही आपल्या घरच्या मंडळीशी चर्चा करुन जहागीरपूर येथे पुष्पहार घालून विवाह करण्याचा निर्णय घेतला. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा आदर्शवत विवाह सोहळा पार पडला.

Web Title: Adarsh ​​Marriage of Higher Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.