Accidental death of 2 youths returning to their home by celebrating New Year in Yavatmal | यवतमाळ : न्यू इअरचं सेलिब्रेशन करुन घराकडे परतणा-या 2  तरुणांचा अपघाती मृत्यू

यवतमाळ : न्यू इअरचं सेलिब्रेशन करुन घराकडे परतत असताना झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बाभूळगाव तालुक्यातील चोंढी फाट्यावर घडली आहे. तर   एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री उशिरा १२.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

गौरव संजय सपाटे (२४), राहुल अशोक बोराडे (२३) अशी मृतांची नावं आहेत. तर विशाल लक्ष्मणराव काळे (२९) असे जखमीचे तरुणाचं नाव आहे. हे तिघेही बाभूळगाव तालुक्यातील सावर येथे नववर्षाची पार्टी करण्यासाठी गेले होते. तेथून कारने घराकडे परत येत असताना चोंढीजवळ त्यांच्या कारला रात्री १२.४५ वाजताच्या सुमारास अपघात झाला. 

या अपघातात गौरव आणि राहुल यांचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल गंभीर जखमी झाला. गौरव हा दारव्हा येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बीए अंतिम वर्षाला शिकत होता. त्याचे वडील संजय सपाटे यवतमाळ पंचायत समितीत भांडारपाल पदावर कार्यरत आहे. राहुल बोराडे हा इयत्ता १२ वी पास झालेला तरुण असून त्याचे वडील जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात कार्यरत आहे. जखमी विशाल काळे हा यवतमाळ नगरपरिषदेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. या अपघाताचे वृत्त पसरताच उज्वलनगरात शोककळा पसरली. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे.

 


Web Title: Accidental death of 2 youths returning to their home by celebrating New Year in Yavatmal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.