नदीतील प्रवाह अचानक वाढल्याने घडली दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:32 PM2018-09-25T22:32:15+5:302018-09-25T22:32:58+5:30

येथील खुनी नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने गणेश विसर्जनासाठी नदीत गेलेले युवक सोमवारी रात्री नदीत बुडाले. मंगळवारी एकाचा मृतदेह हाती आला. उर्वरित दोघांना शोधण्याची मोहिम तीव्र करण्यात आली आहे.

Accident due to sudden increase in river flow | नदीतील प्रवाह अचानक वाढल्याने घडली दुर्घटना

नदीतील प्रवाह अचानक वाढल्याने घडली दुर्घटना

googlenewsNext
ठळक मुद्देदोघांचा युद्धस्तरावर शोध : घटनेच्या पुनरावृत्तीने पांढरकवडावासी हादरले, यवतमाळवरून आणली बोट

नरेश मानकर/बंडू सोयाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : येथील खुनी नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने गणेश विसर्जनासाठी नदीत गेलेले युवक सोमवारी रात्री नदीत बुडाले. मंगळवारी एकाचा मृतदेह हाती आला. उर्वरित दोघांना शोधण्याची मोहिम तीव्र करण्यात आली आहे.
१५ दिवसांपूर्वीच ऐन पोळ्याच्या दिवशी तीन बालकांचा पाण्याच्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेतून सावरत नाही तोच, पुन्हा तीन युवक नदीत वाहून गेल्याची घटना घडल्याने नागरिक सुन्न झाले आहेत.
शुभम सुरेश गेडाम (२३), पृथ्वीराज चरणदास पेंदोर (२३) व पिंटु उर्फ नितीन रोहिदास गेडाम (३०) अशी नदीत बुडालेल्या युवकांची नावे आहेत. विसर्जनासाठी खोल पाण्यात शिरत असतानाच नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला व या प्रवाहात तीन युवक वाहून गेले. दोन युवक मात्र नदीच्या पात्राबाहेर निघण्यात यशस्वी झाले. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांचे शोधकार्य सुरू झाले.
मंगळवारी सकाळी ९ वाजता यवतमाळ येथून शोध कार्यासाठी बोट आणण्यात आली. या बोटीद्वारे खुनी नदीच्या महादेव घाटापासून तर इमामडोह व झुंजापूरपर्यंत सकाळी ९ वाजतापासून शोधकार्य सुरू होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भोई बांधवांच्या हाती नितीन गेडाम याचा मृतदेह लागला. अनेकदा ही बोट बंद पडत असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते.
तर ही घटना टळली असती
तीन बालकांच्या मृत्यूची घटना घडल्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते नटवर शर्मा व संजय झोटींग यांनी प्रशासनाला निवदेन देऊन खुनी नदीच्या पात्राजवळ सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी १२ सप्टेंबर रोजी निवेदनातून केली होती. नदीकाठी संरक्षक बॅरिगेट्स लावावे, बचाव पथक तयार ठेवावे, लांब दोरीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच करण्यात आले.

Web Title: Accident due to sudden increase in river flow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.