लोहीमध्ये 70 हजाराच्या नकली नोटा पकडल्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 09:46 AM2018-11-21T09:46:03+5:302018-11-21T09:51:06+5:30

दारव्हा तालुक्यातील लोही येथे पोलिसांनी 70 हजार रुपयांच्या नकली नोटा पकडल्या. मंगळवारला मध्यरात्रीच्यासुमारास ही कारवाई करण्यात आली.

70 thousand fake notes were found in the lohi yavatmal | लोहीमध्ये 70 हजाराच्या नकली नोटा पकडल्या 

लोहीमध्ये 70 हजाराच्या नकली नोटा पकडल्या 

googlenewsNext
ठळक मुद्देदारव्हा तालुक्यातील लोही येथे पोलिसांनी 70 हजार रुपयांच्या नकली नोटा पकडल्या. जगदीश खर्डेकर व स्वप्नील राठोड या दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.70 हजार रुपये किमतीच्या पाचशे, दोनशे रुपयांच्या नकली नोटा, विविध शासकीय कार्यालये, अधिकारी डॉक्टरांचे रबरी शिक्के व इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले.

दारव्हा : दारव्हा तालुक्यातील लोही येथे पोलिसांनी 70 हजार रुपयांच्या नकली नोटा पकडल्या. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी जगदीश खर्डेकर व स्वप्नील राठोड या दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी मंगळवारी (20 नोव्हेंबर) मध्यरात्री लोही येथे नकली नोटा छपाईच्या ठिकाणावर धाड टाकली. त्यावेळी मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले. 70 हजार रुपये किमतीच्या पाचशे, दोनशे रुपयांच्या नकली नोटा, विविध शासकीय कार्यालये, अधिकारी डॉक्टरांचे रबरी शिक्के व इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहे. चौकशीनंतर बुधवारी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Web Title: 70 thousand fake notes were found in the lohi yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.