वाहतूक व्यवस्थेसाठी ४४ लाखांचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 09:46 PM2018-02-22T21:46:13+5:302018-02-22T21:46:37+5:30

यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात असून त्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी ४४ लाखांचा संयुक्त आराखडा तयार केला आहे.

44 lakhs for traffic system | वाहतूक व्यवस्थेसाठी ४४ लाखांचा आराखडा

वाहतूक व्यवस्थेसाठी ४४ लाखांचा आराखडा

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांना साकडे : यवतमाळ नगरपरिषदेकडे जिल्हा वाहतूक शाखेचा साडेसहा लाखांचा प्रस्ताव

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात असून त्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी ४४ लाखांचा संयुक्त आराखडा तयार केला आहे. हा आराखडा पालकमंत्री मदन येरावार यांना सादर करण्यात आला असून या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून निधी मागितला जाणार आहे.
यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते व त्यांच्या चमूकडून सुरु आहे. रात्री १० पर्यंत वाहतूक पोलीस पार्किंगमधील बेशिस्त वाहनांवर कारवाई करताना दिसत आहे. परंतु वाहतूक पोलिसांपुढेही अनेक अडचणी आहेत. शहरात प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी व बाजारपेठेत पिवळे पट्टे मारलेले नाहीत. त्यामुळे वाहनांवर कारवाई करताना जनतेच्या रोषाचा सामना वाहतूक पोलिसांना करावा लागतो. अशीच स्थिती चौकाचौकातील सिग्नलवर पांढºया पट्यांबाबत आहेत. अनेक ठिकाणी पिवळे व पांढरे पट्टे पुसले गेलेले आहेत. शहरात बहुतांश ठिकाणी सूचना फलक, साईन बोर्ड लावले गेलेले नाही. जिथे कुठे असतील त्या बोर्डांची साईज बरीच लहान आहे. त्यामुळे ते वाहनधारकांच्या सहज दृष्टीस पडत नाही. काही ठिकाणी नो-एन्ट्री, प्रवेशास मनाई असे स्पष्ट लिहिण्याऐवजी केवळ ओळख चिन्ह काढले आहे. त्यावरून सामान्य नागरिकाला बोध होत नाही. बहुतांश दत्त चौकात हा प्रकार होतो. एक दिशा मार्गाचा फलक अगदीच लहान व चिन्हांकीत असल्याने नवख्या वाहनधारकाचा गोंधळ उडतो व त्याला वाहतूक पोलिसाच्या चालानच्या कारवाईला सामोरे जावे लागते. सूचना फलक, पट्टे याबाबत वाहतूक पोलिसांनी यवतमाळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांकडे वारंवार पत्र दिले. वैयक्तिक संपर्क साधून पाठपुरावा केला. मात्र अद्यापही तातडीने प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई करताना विचार करावा लागतो आहे.
कुणीही अधिकारी वाहतूक शाखेत आला तरी दीड-दोन वर्ष राहील, त्यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था केवळ अधिकाºयांपुरती मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी शिस्त लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. त्याच एक भाग म्हणून वाहतूक पोलीस शाखेने सुमारे ४४ लाखांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला आहे. या निधीतून संपूर्ण यवतमाळ शहरात ठिकठिकाणी सूचना फलके, साईन बोर्ड व इतर व्यवस्था केल्या जाणार आहेत. नगरपरिषदेलासुद्धा पिवळे व पांढऱ्या पट्ट्यांसाठी साडेसहा लाखांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. ४४ लाखांच्या या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार आग्रही असल्याचे सांगितले जाते.
दरदिवशी २०० वाहनांवर कारवाई
जिल्हा वाहतूक शाखेत पूर्वी दिवसभरात सात ते दहा वाहनांवर कारवाई केली जात होती. परंतु आता हा आकडा २०० वर पोहोचला आहे. पूर्वी वातानुकुलीत वाहनातून फिरणारे पोलीस आता हा आकडा गाठण्यासाठी रात्री १० पर्यंत पायदळ फिरताना दिसत आहे. लायसन्स आणि इन्शोरन्सबाबत वाहतूक पोलीस गंभीर आहे. लायसन्स नसल्यास एक हजार रुपये व इन्शोरन्स नसल्यास २३०० रुपये दंड ठोठावला जातो आहे. त्यातही जिल्हा वाहतूक शाखा ही समाजसेवी शाखा, सुधार शाखा असल्याचे मानून ग्रामीण भागातील गोरगरीब व रुग्णालयाच्या कामाने येणाºया वाट चुकलेल्या वाहनधारकांना सुधारणेच्या सूचना देऊन सोडून दिले जात आहे.

Web Title: 44 lakhs for traffic system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.