पांढरकवडा रोडवरुन ११ तलवारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 09:34 PM2019-05-21T21:34:29+5:302019-05-21T21:34:48+5:30

शहरात घातक कारवाया करण्यासाठी विविध मार्गाने शस्त्र आयात केले जात आहे. काहींनी यातही रोजगार शोधला असून आॅनलाईन मार्केटिंगवर कमी किमतीत आलेली शस्त्रे येथे दामदुप्पट दरात विकली जात आहे. अशाच एका रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छडा लावला. एकास अटक करून त्याच्या जवळून तब्बल ११ तलवारी जप्त केल्या. विशेष म्हणजे महिनाभरपूर्वीसुद्धा येथून तलवारी जप्त केल्या होत्या.

11 swords seized from Pandarakawada road | पांढरकवडा रोडवरुन ११ तलवारी जप्त

पांढरकवडा रोडवरुन ११ तलवारी जप्त

Next
ठळक मुद्देएकाला अटक : यवतमाळात घातक शस्त्र विक्रेत्यांचे रॅकेट, ‘एलसीबी’ची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात घातक कारवाया करण्यासाठी विविध मार्गाने शस्त्र आयात केले जात आहे. काहींनी यातही रोजगार शोधला असून आॅनलाईन मार्केटिंगवर कमी किमतीत आलेली शस्त्रे येथे दामदुप्पट दरात विकली जात आहे. अशाच एका रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छडा लावला. एकास अटक करून त्याच्या जवळून तब्बल ११ तलवारी जप्त केल्या. विशेष म्हणजे महिनाभरपूर्वीसुद्धा येथून तलवारी जप्त केल्या होत्या.
सलीम उर्फ जिन्नाद खान बशीर खान (२७ ) रा. अशोकनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सलीमचे पांढरकवडा मार्गावर ताज कुशन हे दुकान आहे. येथूनच तो तलवारींचे डिलिंग करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. यावरून सापळा रचून सहायक पोलीस निरीक्षक नीलेश सुरडकर यांच्या पथकाने धाड टाकली. या दुकानातून तब्बल ११ धारदार व विविध डिझाईनच्या तलवारी जप्त करण्यात आल्या. सलीमसह शेख इमरान शेख मुख्तार याला ५ एप्रिल रोजी तलवारी घेऊन जाताना अटक केली. त्यावेळी त्याच्या जवळून तीन तलवारी, दोन चाकू जप्त केले. लाडखेड येथील ऋषभ यादव बोबडे याला दोन तलवारी २ हजार ६०० रुपयांत विकल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी लाडखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर सलीम काही दिवस शांत होता. त्याने परत हालचाल सुरू करताच एलसीबीने कारवाई केली.
सहाशेची तलवार दोन हजारांत
आॅनलाईन शॉपिंगची सुविधा देणाऱ्या विविध वेबसाईटवरून या तलवारी बोलावण्यात आल्या. अतिशय सुरक्षितपणे तलवारी घरपोच येतात. ६०० रुपयांची तलवार दोन हजारांत विकली जाते. यामध्ये घसघशीत मिळकत असल्याने सलीमने हा व्यवसाय सुरू केल्याची कबुली दिली.

Web Title: 11 swords seized from Pandarakawada road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.