Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस?

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: तापट स्वभावावर आज नियंत्रण ठेवणे हितावह राहील. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. सरकारी कामात यश मिळेल.
वृषभ: कोणतेही कार्य खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वास ह्यांच्या जोरावर पूर्ण कराल. लाभ होईल. सरकारी कामात आर्थिक यश मिळेल.
मिथुन: नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल दिवस. शासनाकडून काही लाभ होतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील.
कर्क: नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. निराशा व असंतोषाची भावना होईल. कुटुंबियांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे.
सिंह: आत्मविश्वास दांडगा असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन घेऊ शकाल. सामाजिक मान - मरातब वाढेल.
कन्या: वाद होण्याची शक्यता आहे. मित्रांशी गैरसमज होतील. स्वभावात तापटपणा वाढेल. अचानकपणे खर्च उद्भवतील.
तूळ: दिवस शुभ फलदायी. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. प्राप्तीत वाढ संभवते.
वृश्चिक: दिवस शुभ फलदायी. नोकरी-व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढती होऊ शकते.
धनु: आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यवसायात अडथळे येतील. कोणतीही योजना विचारपूर्वक अंमलात आणा.
मकर: अचानकपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. क्रोध तसेच नकारात्मक विचारांवर संयम ठेवावा लागेल.
कुंभ: प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलीची शक्यता आहे. भागीदारीतून फायदा होईल. वाहन सौख्य मिळेल.
मीन: दिवस शुभ फलदायी. मनोबल व आत्मविश्वास दृढ असेल. घरात सुखशांती नांदेल. अपेक्षित सहकार्य मिळेल. चांगली बातमी मिळेल.
क्लिक करा