Tap to Read ➤

Old Monk वर कोणाचा फोटो आहे माहितीये? पाहा 'नावा'मागची कहाणी

१९५४ पासून येत असलेली ही रम आजही अनेकांची पहिली पसंती आहे.
ओल्ड मॉन्क या रमचा चाहता वर्ग निराळाच आहे. १९५४ पासून येत असलेली ही रम आजही अनेकांची पहिली पसंती आहे.
ओल्ड मॉन्कच्या अनोख्या बॉटल्सही लोक आपल्या घरात ठेवत असतात. परंतु या बॉटलवर असलेला चेहरा कोणाचा आहे आणि ही रम कशी, कोणी तयार केली हे माहितीये?
जाणून घेऊया या रमची सुरुवात कशी झाली आणि ही भारतीय रम जगभरात पसंतीस कशी उतरली?
मोहन मिकिन लिमिटेड ओल्ड मॉन्कचं उत्पादन करते. या रमच्या निर्मात्यांचं नाव कर्नल वेद रतन आहे, जे माजी राज्यसभा खासदार, लखनौचे माजी महापौर आणि सेन्सर बोर्डाचे चेअरमनही होते.
कर्नल वेद रतन मोहन यांनी १९५४ मध्ये ओल्ड मॉन्क रम लॉन्च केली होती. याची कल्पना त्यांना सुचली कुठून हे पाहू.
ते रम लॉन्च करण्यापूर्वी एकदा युरोपला गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी बेनेडिक्टिन मॉन्क्सची जीवनशैली आणि त्यांची मद्य तयार करण्याची क्षमता पाहिली.
बेनेडिक्टिन मॉन्क्सच्या सन्मानार्थच वेद रतन मोहन यांनी या रमचं नाव ओल्ड मॉन्क ठेवलं असं म्हटलं जातं.
त्या बॉटलवर छापल्या जाणाऱ्या चेहऱ्याबद्दल बोलायचं झालं, तर तो चेहरा एचजी मिकिन यांचा असल्याचं म्हटलं जातं. त्यांनी मोहन यांच्यासोबत मद्याची फॅक्ट्री खरेदी केली होती.
यांचंच नाव कंपनीच्या नावातही येतं. काही जण यावर असलेला फोटो हा बेनेडिक्टिन मॉन्कचा असल्याचं म्हणतात.
ओल्ड मॉन्क जगातील प्रसिद्ध इंडियन मेड फॉरेन लिकरपैकी एक आहे. आज हा जवळपास २००० कोटी रुपयांचा ब्रँड बनलाय.
क्लिक करा