Video : वाशिम - सामाजिक सभागृहात थाटली पोलीस चौकी! त्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची कर्तव्याला दांडी

By ऑनलाइन लोकमत on Thu, February 08, 2018 3:43pm

वाशिम : जिल्ह्यातील कीन्हीराजा येथे चक्क सामाजिक सभागृहात पोलिस चौकी थाटली असून गैरसोयींमुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. परिणामी दैनंदिन कामकाजही प्रभावित होत आहे. ४२ गावांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ४० वर्षांपूर्वी कीन्हीराजा येथे ग्रामपंचायतीच्या एका खोलीत सुरू झालेली पोलीस चौकी मध्यंतरी सामाजिक सभागृहात हलविण्यात आली. त्याठिकाणी १० बाय १५ च्या एका खोलीत पोलिसांना कर्तव्य पार पाडावे लागत आहे. या चौकीअंतर्गत येणा-या ४२ गावांपैकी काही गावे अत्यंत संवेदनशिल असून पोलिस कर्मचा-यांना सदोदित तत्पर राहावे लागते. याशिवाय ही चौकी औरंगाबाद-नागपूर महामार्गावर असल्याने अधुनमधून घडणा-या अपघातांची प्रकरणेही हाताळावी लागतात. त्यामुळे किन्हीराजात सुसज्ज पोलीस चौकी असणे नितांत गरजेचे आहे.         

संबंधित

मटका अड्ड्यावर हप्ता घेणाऱ्या पोलिसांचं स्टिंग ऑपरेशन
सांगलीत पोलिसाची हत्या, हत्येचा थरार 'सीसीटीव्हीत' कैद
पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला बँक मॅनेजरच्या अपहरणाचा डाव
शेलूबाजार पोलीस चौकी जलमय! पोलीस कर्मचा-यांची दमछाक
भुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा

वाशिम कडून आणखी

शेतीच्या वादामुळे मुलाने आईला ट्रॅक्टरखाली लोटलं
शासकीय कार्यालयांना जलपुनर्भरणाचा विसर
शेलूबाजार पोलीस चौकी जलमय! पोलीस कर्मचा-यांची दमछाक
वाशिमात पावसामुळे भिजला लाखो रुपयांचा शेतमाल
भुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा

आणखी वाचा