Next

मालेगावात ‘कॅन्डल मार्च’ काढून २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 10:27 PM2017-11-26T22:27:35+5:302017-11-26T22:44:27+5:30

मालेगाव (वाशिम): २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना येथे ‘कॅन्डल मार्च’ काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यासाठी जय श्रीराम गृप व नागरिकांनी पुढाकार घेतला.

ठळक मुद्देनागरिकांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभागजय श्रीराम ग्रूप व नागरिकांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना येथे ‘कॅन्डल मार्च’ काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यासाठी जय श्रीराम गृप व नागरिकांनी पुढाकार घेतला.मुंबई शहरावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह १९७ जण ठार झाले होते; तर ८०० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. या घटनेत हेमंत करकरे, विजय सालस्कर, अशोक कामटे, तुकाराम आेंबळे या पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनाही आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, जनतेच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणा-या या शहिदांचे स्मरण म्हणून मालेगावातील जय श्रीराम गृप व इतर नागरिकांनी पुढाकार घेवून भव्य स्वरूपात ‘कॅन्डल मार्च’ काढला. जुने बसस्थानक परिसरातून रात्री ७ वाजता निघालेला हा मार्च मेडिकल चौक, गांधी चौक, शिव चौक यामार्गे जात राम मंदिरासमोर त्याची सांगता झाली. त्याठिकाणी सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आशिष बळी, संतोष जोशी, देवा राऊत, संतोष सुरडकर, तस्लीम सय्यद, गजानन बळी, गजानन केंद्रे, अजय घुगे, तेजस आरू, अमोल सोनुने, किशोर महाकाळ, अभी घुगे, शाम काबरा, प्रा. प्रकाश कापुरे, ओम खुरसडे, सागर अहिर यांच्यासाह शंभू राजे प्रतिष्ठान, बजरंग दल, भगतसिंग गृपच्या सदस्यांची उपस्थिती होती.