Next

वाशिममध्ये गुंजला ‘जय गजानन’चा गजर ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 04:41 PM2018-02-06T16:41:32+5:302018-02-06T16:41:56+5:30

वाशिम : आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे अल्पावधीतच नावारूपास आलेल्या शहरातील संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने ‘श्रीं’च्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त मंगळवार, ६ ...

वाशिम : आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे अल्पावधीतच नावारूपास आलेल्या शहरातील संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने ‘श्रीं’च्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी शहरातील मुख्य मार्गावरून पालखी सोहळा काढण्यात आला. यात जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या ५० वारकरी दिंड्या व असंख्य भजनी मंडळांनी सहभाग नोंदवून ‘जय गजानन’चा गजर  केला. यावेळी शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :वाशिमwashim