Next

शाळांच्या फी दरवाढीविरोधात पालकांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 07:19 PM2018-10-26T19:19:10+5:302018-10-26T19:19:21+5:30

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम सुधारणा पत्र २०१८ नुसार नवीन कायदा केला जाणार आहे. या कायद्यामुळे खाजगी शाळांना फी वाढी ...

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम सुधारणा पत्र २०१८ नुसार नवीन कायदा केला जाणार आहे. याकायद्यामुळे खाजगी शाळांना फी वाढी संदर्भात एकतर्फी अधिकार मिळणार आहे.  ज्यामुळे खाजगी शाळांत शिकणा-या मुलांचे शिक्षण आणखी महाग होणार याचा निषेध म्हणन ठाण्यात आज  खाजगी शाळांमध्ये शिकत असलेल्या मुलांच्या पालकांनी दंडाला काळ्या फीत बांधून हातात निषेधाचे फलक घेऊन शांतेत ठाणे महानगरपालिके समोर मोर्चा काढला. तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे राज्य सरकार पर्यंत पोहोचवावे, अशी विनंती पालकांनी पत्रकाद्वाके केली आहे.