Next

जलसंपदा मंत्र्यांनी धरला गरब्यात ठेका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 03:00 PM2018-10-12T15:00:23+5:302018-10-12T15:05:48+5:30

डोंबिवली - राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क गरब्यात ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला ...

डोंबिवली - राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क गरब्यात ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. महाजन हे गुरुवारी एका कार्यक्रमासाठी डोंबिवलीत आले होते. तिथून त्यांनी एका दांडियाच्या कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी तिथलं वातावरण पाहून गिरीश महाजन यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. त्यांच्यासोबत असलेले आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार कुमार आयलानी यांनीही त्यांना साथ दिली.