Next

बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 01:14 PM2019-01-04T13:14:07+5:302019-01-04T13:15:16+5:30

ठाणे -  बदलापूरमध्ये  एका केमिकल कंपनीला शुक्रवारी (4 जानेवारी) भीषण  आग  लागल्याची घटना समोर आली आहे. माणकीवली एमआयडीसीतील प्लॅटीनम ...

ठाणे -  बदलापूरमध्ये  एका केमिकल कंपनीला शुक्रवारी (4 जानेवारी) भीषण  आग  लागल्याची घटना समोर आली आहे. माणकीवली एमआयडीसीतील प्लॅटीनम पॉलिमर कंपनीला  आग  लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  बदलापूर , अंबरनाथ, उल्हासनगर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.