Next

अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी परिसरातील गोडाऊनला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 03:36 PM2018-12-19T15:36:08+5:302018-12-19T15:39:17+5:30

सोलापूर  : अक्कलकोट  एमआयडीसी  परिसरातील मर्दा टेक्सटाईल गोडाऊनला आग लागल्यामुळे लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी ...

सोलापूर  : अक्कलकोट  एमआयडीसी  परिसरातील मर्दा टेक्सटाईल गोडाऊनला आग लागल्यामुळे लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी 11.30 वाजता घडला. बुधवार असल्याने  एमआयडीसी  येथील कारखान्यांना सुट्टी होती. मर्दा टेक्सटाईलच्या गोडाऊनला अचानक आग लागली. वाऱ्यामुळे आगीने रूद्ररूप धारण केले. धुराचे लोळ एमआरडीसी परिसरता पसरली होती.

टॅग्स :आगfire