Next

महाबळेश्वरात पावसाची संततधार, पर्यटक लुटतायत मनमुराद आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 04:26 PM2018-06-25T16:26:08+5:302018-06-25T16:28:23+5:30

महाबळेश्वर म्हटलं की आठवतात वेगवेगळ्या ऋतूत दिसणारी वेगवेगळी मोहक रूपं. वैशाख व ज्येष्ठाच्या उंबरठ्यावर येणारं सुखद धुक्याचं वातावरण अन् यानंतर चार महिने कोसळणारा मुसळधार पाऊस. निसर्गाने नटलेल्या या महाबळेश्वरात वरुणराजाचे आगमन झाले असून, अनेक हौशी पर्यटक या पावसाची मजा लुटण्यासाठी पर्यटनस्थळी दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देमहाबळेश्वरात पावसाची संततधार, पर्यटक लुटतायत मनमुराद आनंदवर्षाराणीने न्हाऊ घातले निसर्गसुंदरीला

महाबळेश्वर/सातारा : महाबळेश्वर म्हटलं की आठवतात वेगवेगळ्या ऋतूत दिसणारी वेगवेगळी मोहक रूपं. वैशाख व ज्येष्ठाच्या उंबरठ्यावर येणारं सुखद धुक्याचं वातावरण अन् यानंतर चार महिने कोसळणारा मुसळधार पाऊस. निसर्गाने नटलेल्या या महाबळेश्वरात वरुणराजाचे आगमन झाले असून, अनेक हौशी पर्यटक या पावसाची मजा लुटण्यासाठी पर्यटनस्थळी दाखल झाले आहेत.राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असताना पावसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढू लागला आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. या पावसाची मजा लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.पावसाळा सुरू झाल्याने येथील बहुतांश पॉर्इंट पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटक पाऊस व धुक्याच्या दुलईत वेण्णा तलाव येथे नौकाविहार करीत आहेत. गरमागरम चणे, शेंगदाणे आणि मक्याची कणसे हा पर्यटकांचा पावसाळ्यातील सर्वात आवडता मेनू असल्याने याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसामुळे डोंगरकपारीतील लहान-मोठे धबधबे प्रवाहित झाले असून, पर्यटकांना आकर्षित करू लागले आहेत.पावसातही घोडेस्वारीमहाबळेश्वरमधील काही स्थानिक नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय म्हणजे घोडेस्वारी. गर्द धुके आणि कोसळणाºया सरीत घोडेस्वारी करण्याची मजा पर्यटक लुटत आहेत. घोड्यावर बसून जंगलाची रपेट मारणे आणि पावसाळी सौंदर्य न्याहाळणे हा पर्यटकांसाठी एक अस्विस्मरणीय अनुभव ठरत आहे.