Next

सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचे पुण्यात जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:31 AM2018-04-17T11:31:52+5:302018-04-17T11:32:35+5:30

ती आली,  तिने पहिले आणि तिने जिंकले अशी स्थिती पुण्यात रविवारी झालेली बघायला मिळाली. भारतमाता की जय, जय शिवाजी जय ...

ती आली,  तिने पहिले आणि तिने जिंकले अशी स्थिती पुण्यात रविवारी झालेली बघायला मिळाली. भारतमाता की जय, जय शिवाजी जय भवानी, वंदे मातरम् या घोषणांनी रविवारी पुणे येथील आंतरराष्ट्रीय  विमानतळावर सुवर्ण व रौप्यपदकविजेत्या नेमबाज  तेजस्विनी सावंतचे  जल्लोषात स्वागत झाले. यावेळी तिची एक झलक टिपण्यासाठी शेकडो कॅमेरे लखलखत होते. घरच्यांचा व सहकाऱ्यांचा  पाठिंबा  आणि सरावादरम्यान केलेले योग्य नियोजन यामुळे गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल  स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकू शकले, असे ‘गोल्डन गर्ल’ तेजस्विनीने सांगितले.