Next

पुणे: शनिवारवाड्याचे पटांगण पणत्यांनी उजळले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 08:58 PM2017-10-16T20:58:49+5:302017-10-16T20:59:28+5:30

चैतन्य हास्य योग मंडळाच्या वतीने आज दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून हजारो पणत्यांनी शनिवारवाडा पटांगण उजळून निघाले होते.

पुणे: चैतन्य हास्य योग मंडळाच्या वतीने आज दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून हजारो पणत्यांनी शनिवारवाडा पटांगण उजळून निघाले होते. पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक हेमंत रासने, चैतन्य हास्य मंडळाचे कार्याध्यक्ष अरुण पाठक, सहकार्याध्यक्ष प्रभाकर घूले, व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. अनेक लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पटांगणाच्या मध्यवर्ती भागात पणत्या लावून  सुंदर कमळ काढण्यात आले होते. तर एका बाजूला दिवा आणि दुसऱ्या बाजूला कंदील असे विविध आकार देऊन पणत्या लावण्यात आल्या होत्या.