Next

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 02:10 PM2018-09-06T14:10:41+5:302018-09-06T14:10:59+5:30

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद ठेवण्यात आला आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत खालापूर टोलनाक्याजवळ ...

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद ठेवण्यात आला आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत खालापूर टोलनाक्याजवळ ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचं काम करण्यात येणार आहे. यासाठी दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात आली असून या दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून शेडुंग फाटा येथून वाहतूक जुन्या मुंबई- पुणे मार्गावर वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :पुणेPune