Next

सुशीला आजींच्या नृत्यावर लाखो लाईक्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 04:35 PM2017-12-05T16:35:12+5:302017-12-05T16:35:22+5:30

- प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : एकीकडे झिंगाटसारखं उडत्या चालीचं गाणं तर दुसरीकडे जा तोसे नहीं बोलूं कन्हैया सारखे लयबद्ध गीत....दोन्ही गाण्यांवर ...

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : एकीकडे झिंगाटसारखं उडत्या चालीचं गाणं तर दुसरीकडे जा तोसे नहीं बोलूं कन्हैया सारखे लयबद्ध गीत....दोन्ही गाण्यांवर तेवढ्याच उत्साहाने नृत्य करणा-या पुण्याच्या सुशीला आज्जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ऐंशी वर्षांच्या या आजींच्या नृत्याच्या व्हिडीओला तीन दिवसांत १२ लाख व्ह्यूज मिळाले असून, हजारो शेअर तर लाखो लाईक्स आणि कमेंटसचा अक्षरश: पाऊस पडत आहे. 

टॅग्स :पुणेPune